Breaking News

Editor

न्यायालयाचा निर्णय: आरोपी देणार मृतकाच्या वारसाला ११ लाखाची नुकसान भरपाई दिंडोशी न्यायालयाचा निकाल

मुंबई: विशेष प्रतिनिधी कांदिवली येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेबरोबर ११ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही दंडाची रक्कम खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देण्याचा निर्णय दिंडोशी न्यायालयाने दिला. दिंडोशी न्यायालयाने दिलेला निकाल आतापर्यतच्या न्यायालयांपेक्षा वेगळा आहे. कांदिवली येथी रहिवाशी स्व.कपूरचंद गुप्ता आणि खून प्रकरणातील आरोपी शिवप्रसाद …

Read More »

राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं ? शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाणार तेलशुद्धीकरण  प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. नाणारमध्ये २२१ गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांना विकासाचे वचन तर राज ठाकरेंचे नाणारसाठी पत्र उध्दव ठाकरेसह शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन बोलताना कोकणवासियांना भराडी देवीच्या साक्षीने कोकण विकासाचे वचन दिले. या वचनास २४ तासांचाही अवधी उलटून जात नाही तोच मनसेने नाणार प्रकल्पाला सुरुवातीला केलेला विरोध सोडून आता हा प्रकल्प हातातून जाता कामा नये अशी भूमिका घेत नाणार प्रकल्प उभारणीमुळे …

Read More »

तहसीलदार संघटनेचा काम बंदचा इशारा तर महसूल मंत्र्याची विनंती चर्चेला लवकरच बोलविण्याचे संघटनेला आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या महसूली यंत्रणेत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आपल्या विविध मागण्यासंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच ८ मार्च २०२१ रोजीपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार संघटनेने दिला असून मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला. तहसीलदार संघटनेच्या या इशाऱ्याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी १० हजारापार तर मुंबई- पुणे मंडळात रूग्णांमध्ये वाढ १० हजार १८७ नवे बाधित, ६ हजार ८० बरे झाले, तर ४७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराहून अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ठाणे मंडळातील मुंबईतील बाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा एक हजार बाधितांचा आकडा पार केला आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत २०० हून अधिक बाधित आढळून आल्याने मुंबई महानगर अर्थात ठाणे मंडळात २ हजार २०८ एकूण …

Read More »

भराडी देवीच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी दिले कोकणवासीयांना हे वचन कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी

मुंबई-मालवण : प्रतिनिधी शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन करत भराडी देवीच्या साक्षीने मी सांगतोय कोकणचा विकास …

Read More »

आघाडी सरकारच्या गुन्हेगारीकरणा विरोधात २० हजार सभा घेणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक …

Read More »

विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …

Read More »

अजित पवारांना पडला प्रश्न म्हणाले सुधीर भाऊंना झालेय काय ? सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची मिश्कील सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली. विधानसभेत आज विरोधकांनी …

Read More »

देशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

मुंबईः प्रतिनिधी भारताबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली असून आगामी वर्षभरात उणे ८ टक्के तर उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात उमे ९.० टक्के वाढ होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फक्त कृषी क्षेत्रात सरळ ११.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचा आर्थिक …

Read More »