Breaking News

आंबेडकरी साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन : अनेक मान्यवरांची आदरांजली वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नागपूर-मुंबई : प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्ये, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रणेते, बौध्द दलित साहित्यात चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यक डॉ भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी पहाटे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पाली विभागाचे ते रिडर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. तसेच विदर्भ साहित्य समेंलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी पीएचडीसाठी महाराष्ट्रातील संत साहित्यावर बौध्द धम्माचा प्रभाव हा विषय प्रबंधासाठी निवडला होता. तसेच रशियातील बौध्द धर्म याविषयावर त्यांनी पुस्तक लिहिले होते.

डॉ.लोखंडे यांची प्रकाशित पुस्तके पुढीलप्रमाणे : अयोध्या कुणाची रामाची? बाबराची ? कि बुध्दाची, डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणीवा, महाकवी अश्वघोषरचित बुध्दचरित, रशियातील बौध्द धर्म, सौन्दरनंद महाकाव्यम् , डॉ. आंबेडकरी २२ प्रतिज्ञा, बौध्दांचे सण-उत्सव आणि मानसिकता, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार.

 

उत्तम भाष्यकारचळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला

महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा  गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे.विदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते. आंबेडकरी , दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे. डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना विनम्र श्रद्धांजली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 

डॉ.लोखंडेच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी

प्रा. भाऊ लोखंडे यांनी बौद्ध आणि दलित साहित्याच्या चळवळीत मोठे योगदान दिले. रशियातील बौद्धधर्म, मराठी साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. इतर देशांमध्येही त्यांची व्याख्याने बरीच गाजली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता त्यावर उदबोधन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *