Breaking News

संजय राऊत यांचा सवाल,… मोदीजी हिंदूत्ववादी दोन्ही नेत्यांना भारतरत्न कधी?

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या नियमानुसार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत रत्न पुरस्कार फक्त तीन जणांना जाहिर करता येतो. परंतु एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्ववादी नेत्यांना वगळून इतर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोदींना हिंदूत्ववादी नेत्यांचा विसर असे आरोप करत टीकास्त्र सोडले.

संजय राऊत यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्कींग साईटवर गुजरातच्या मुख्यमंत्री पदी असताना नरेंद्र मोदी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होतानाचा फोटो ट्विट करत आधीचे दोन आणि नंतरचे तीन असे पाच भारतरत्न पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच महिन्यात जाहिर केले. परंतु हिंदूत्ववादी नेत्यांमुळे ज्या राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला आणि तसेच ज्यांनी अभय दिले त्यांनाही विसरले अशी खोचक टीकाही केली.

तसेच संजय राऊत पुढे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, नियमानुसार एका वर्षात तीन जणांनाच भारतरत्न पुरस्कार जाहिर करता येतात. परंतु लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत नरेंद्र मोदी यांनी पाच महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. कर्पुरी ठाकूर यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी आणि आज माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन आणि चौधरी चरणसिंग अशा पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हिंदूत्वाचे आणि हिंदू लाटेचे खरे शिल्पकार आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडला. खरे तर स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी हे राम मंदिराचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करू शकले अशी खोचक आठवण करून देत वीर सावरकर यांनाही मोदी विसरल्याची आठवण करून देत या दोन्ही हिंदूत्ववादी नेत्यांना भारतरत्न पुरस्कार कधी जाहिर करणार असा सवालही केला.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *