Breaking News

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे येथे आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. परंतु निखिल वागळे हे त्यांच्या वाहनातच बसून राहिल्याने काही आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा आणि गाडीवर शाईफेक करत रोखण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज डेक्कन जवळ घडली.

निखिल वागळे यांच्या नियोजित सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. परंतु भाजपाच्या दबंगशाहीसमोर न झुकता निखिल वागळे यांनी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी जात असताना निखिल वागळे यांना रोखण्यासाठी रस्त्यात थांबलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक करत गाडीवर दगडफेक केली.

या दगडफेकीत वागळे यांच्या गाडीच्या मागील बाजूची काच फोडण्यात आली. तर वाहनाच्या पुढील बाजूस असलेल्या काचेवर दगड टाकत गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनाच्या पुढील काचेला तडे गेले. तरीही वागळे यांची गाडी थांबत नसल्याचे पाहून ट्रॅफीक जामचा फायदा घेत काही भाजपा कार्यकर्त्यांनी ड्रायव्हरकडील बाजूने आणि वागळे बसलेल्या बाजूने दगडफेक करत निखिल वागळे आणि त्यांच्या ड्रायव्हरला अपाय करण्याचा प्रयत्न भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. परंतु सुदैवाने वाहनाच्या दरवाज्यांना असलेल्या काचा फोडण्यात भाजपा कार्यकर्त्ये अपयशी ठरले.

परंतु निखिल वागळे यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्त्ये पुढे आले. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या महिला कार्यकर्त्यांवर अंडीफेक आणि शाईफेक करत बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला. यात काही महिला कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याचे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, निखिल वागळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी भाजपा आक्रमक हल्लेखोरांना रोखण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या हल्लेखोऱ्यांना नंतर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनीच दिली.

यासंदर्भात पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचत म्हणाले की, निखिल वागळे यांच्या नियोजित सभेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही वागळे हे पुण्यात आले. त्यांच्या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आल्याचेही सांगितले होते. परंतु आक्षेपार्ह न बोलण्याची नोटीस देत त्यांना जाहिर सभेला उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचेही स्पष्ट केले. परंतु पोलिसांनी निखिल वागळे यांच्या सुरक्षेसाठी पोलिस ताफा तैनात करण्यात आल्याचेही सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *