Breaking News

लंडनहून परतताच राहुल नार्वेकर म्हणाले, बाहेर केलेल्या भाष्यावर मी टिप्पणी… सर्वप्रथम पार्टी कुणाची हे ठरवावे लागले त्यानंतरच पुढील निर्णय

शिवसेना फुटीवर आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून १५ दिवस, २० दिवसात तर काहींनी २ महिन्यात निर्णय घेण्याची मागणी केली. यावर सध्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी अपात्रतेच्या निर्णयाबद्दल मोठं विधान केले. तसेच मागणी करणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्याबाबतल बलोताना बाहेर केलेल्या विधानांवर मी टिप्पणी करत नाही असे सांगितले.

यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्याकाही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पार्टी कुणाची आहे? याचा निर्णय होणं आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य निर्णय घेऊ.

विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागणीबाबत विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले, मागण्या सर्वजण करत असतात. पण कायद्यानुसार काही तरतूदी आहेत, इतरही काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. आपल्याला निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही आणि विलंबही करायचा नाही. जो निर्णय होईल, तो निर्णय संविधानातील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला जाईल.

सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यांवर मी टिप्पणी करत नाही. मला तशी टिप्पणी करायची गरजही नाही. त्यामुळे कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पण मी याकडे लक्ष देत नाही. मी कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेणार. कुणाच्या मनासारखं व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल. कुणाचा आरोपांना घाबरून मी निर्णय घेत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.

Check Also

भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला

भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *