Breaking News

रामदास कदम यांची खोचक टीका, सरड्यासारखं रंग बदलण्याचे काम… उध्दव ठाकरे यांच्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या भूमिकेवरून टीका

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. येथील स्थानिक लोकांनी रिफायनरीला विरोध केला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ६ तारखेला बारसू दौऱ्यावर जाणार आहेत. ते बारसूतील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे हे सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम करत आहेत. ते दुतोंडी सापाची भूमिका बजावत आहेत, अशा शब्दांत रामदास कदमांनी टीका केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी रामदास कदम म्हणाले, माझं याबाबत स्पष्ट मत असं आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वत: बारसूची जागा सुचवली होती. तसं त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं होतं. मग मुख्यमंत्री असताना एक भूमिका आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर दुसरी भूमिका, असं का? कोकणात पाऊस आल्यानंतर सरडा जसा रंग बदलतो, तसं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत का? आमच्या कोकणात दुतोंडी गांडूळ असतो, मग उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची भूमिका बजावतायत का?

उद्धव ठाकरेंना उद्देशून रामदास कदम पुढे म्हणाले, जी गोष्ट तुम्हीच सुचवली… जो प्रस्ताव तुम्हीच आणला… त्यावेळी तुम्ही तेथील जनतेशी संवाद साधून हा निर्णय का घेतला नाही? हाही प्रश्न आहे. त्यामुळे हेतुपुरस्कर बारसूमध्ये लाठीचार्ज व्हावा, गोळीबार व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, एवढं करण्यासाठीच हा माणूस (उद्धव ठाकरे) इकडे येतोय.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *