Breaking News

पाकिस्तानी स्तंभलेखक तारेक फतेह यांचे निधनः आरएसएसने ट्विट करत वाहिली श्रध्दांजली कर्करोगाशी झुंज देत ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रख्यात पाकिस्तानी स्तंभलेखक आणि लेखक तारेक फतेह यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तारेक फतेह मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी संघर्ष करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ७३ वर्षांचे होते. त्यांचं कॅनडामध्ये निधन झालं असून त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी याची पुष्टी केली.

“पंजाबचा सिंह… हिंदुस्थानचा पुत्र… कॅनडा प्रियकर… सत्यवादी… न्यायासाठी लढणारा… दीन-दलित आणि तळागाळातील पीडित लोकांचा आवाज… तारेक फतेह यांचं निधन झालं आहे. त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या माध्यमातून त्यांची क्रांती सुरूच राहील. तुम्ही आमच्यात सामील व्हाल का? १९४९-२०२३,” असं नताशा यांनी ट्वीट केलं आहे.

इस्लाम धर्माची चिकित्सा करणारे आधुनिक विचारांचे लेखक म्हणून फतेह यांची ओळख होती. ते पुरोगामी विचारांसाठी आणि पाकिस्तानबाबतच्या टोकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी अनेकदा भारतातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचं कौतुक केलं होतं.

१९४९ साली पाकिस्तानमध्ये जन्मलेले तारेक फतेह १९८० च्या दशकात कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन निवेदक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने तारेक फतेह यांच्या निधनाचे वृत्त कळताच ट्विट करत श्रध्दांजली वाहिली आहे.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *