Breaking News

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आता या वाहनांना बंदी आणि वाहतूक मार्गातही केला बदल नवी मुंबईत १५ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद

नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता १५ एप्रिल २०२३ रोजी दु. १४.०० वा. ते १६ एप्रिल २०२३ रोजी रात्रौ २३.०० वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड – अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

१५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली
टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.

नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते १७ एप्रिल २०२३ च्या सकाळी १०.०० वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.३५ कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे

अ) प्रवेश बंद:-
१५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते १७ एप्रिल २०२३ च्या सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

ब) पर्यायी मार्ग:-
1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळविले आहे.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *