Breaking News

उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधीना ठणकावलं, सावरकर आमचे दैवत…बोलेलं खपवून घेणार नाही काही जण तु्म्हाला सावरकर बोलण्यासाठी डिवचतायत

तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. आम्ही तुमच्यासोबत असल्याने महाराष्ट्रात आदित्य ठाकरे तर काश्मीरमध्ये संजय राऊत सहभागी झाले. आता आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र आलेलो आहोत. पण आज राहुल गांधी यांना जाहिरपणे सांगतोय की, स्वा.सावरकर हे आमचं दैवत आहे. त्यांच्यावर बोललं चालणार नाही असे ठणकावून ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मालेगांव येथील जाहिर सभेत राहुल गांधी यांना सांगितले.

तसेच आमच्या दैवतांवर बोलण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक डिवचलं जातयं पण तुम्ही डिवचून घेऊ नका असा सल्ला राहुल गांधी यांना देत उध्दव ठाकरे म्हणाले, आपण लोकशाहीला वाचविण्यासाठी एकत्र आलेलो असताना फक्त त्याला फाटे फोडून हातात असलेली वेळ घालवू नका असा सूचक इशारा देत नाही तर ही वेळ हातातून जाईल आणि हुकूमशाहीत आपल्याला रहावं लागले असेही म्हणाले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन नुकतेच संपले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अर्थात आज रविवारी उध्दव ठाकरे यांनी शिव गर्जना यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या निमित्ताने मालेगांव येथील जाहिर सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे सावकर यांच्यावर राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने टीका करण्यात येते. या टीकेवरून भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जातो. या टीकेला करारा जवाब देण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच राहुल गांधी यांना सुनावलं.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधताना म्हणाले, त्यांच्याकडे एक लाँड्री आहे. ती लाँड्री त्यांची गुजरातमध्ये आहे. त्यामुळेच ज्यांच्यावर आणि ज्या कुटुंबियांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. ते गुजरातच्या लाँड्रीत गेले की लगेच तेथील निरम्याने ते स्वच्छ होतात. त्यांच्यावरील डाग सगळे पुसले जातात अशी खोचक टीका केली.

प्रत्येकाला कुटुंब असत, मुलंबाळं असतात पण आपली सत्ता अबादीत ठेवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची नात जी गरोदर होती तीचीही बेशुध्द होईपर्यंत चौकशी केली. इतकेच नव्हे तर रूग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीलाही यांनी सोडलं नाही. अशी कुटुंब व्यवस्था नाकारणाऱ्या व्यक्तीमुळेच देशातील लोकशाही हुकुमशाहीकडे जात असल्याचा इशारा देत उध्दव ठाकरे म्हणाले, एकेकाळी यांच्यासोबत असलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी आता कुठे आहेत ? असा खोचक सवालही भाजपाला केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *