Breaking News

उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटाला खोचक टोला, किमान आडनावाप्रमाणे तरी जागा द्या… २०२४ निवडणूकीत आपण यांना फेकून दिलं नाही तर हुकुमशाहीत रहावं लागेल

मालेगांव येथील जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडत म्हणाले, तुम्हाला खरी शिवसेना बघायची असेल तर या इथे मालेगावात या तुम्हाला पाह्यला मिळेल. माझं पक्ष नाव, निवडणूक चिन्ह चोरलंत. पण माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंवर जीवापाड करणारी माणसं तुम्ही हिरावून घेऊ शकला नाहीत. त्यामुळे बाकीचे जे गेले ते खोक्यात अडकलेले गेले अशी खोचक टीका करत मध्यंतरी ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणाले, आम्ही मिंदे गटाला ४८ जागा देणार हे सांगत मिंदे गटाची जागा दाखवून दिली. पण किमान तुमच्या आडनावाचा तरी दर्जा राखून तितक्या जागा त्यांना द्या असा खोचक टोलाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाला लगावला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, २०१९ च्या निवडणूकीत तुम्ही सर्वांनी त्यांना मतदान केलात म्हणून ते निवडूण आले. पण त्यांच्याकडून हुकूमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे. आगामी निवडणूकीत त्यांना खाली खेचलं नाही तर आपण हुकुमशाहीला रोखू शकणार नाही. त्यामुळे ही लढाई उध्दव ठाकरे यांचा पक्ष गेला, निवडणूक चिन्ह गेलं आणि उध्दव ठाकरे यांचं सरकार आणि मुख्यमंत्री पद गेलं म्हणून नाही. तर देशावर आलेल्या हुकुमशाहीच्या संकटाला रोखण्यासाठी ही लढाई असून या लढाईत माझ्यासोबत राहणार का? असे आवाहन उपस्थित जनसमुहाला केले. त्यावेळी शिवसैनिकांनी हात वर करून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सवाल करताना म्हणाले, मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री झालो. पण मी त्यावेळी असे काही ठरवून गेलो नव्हतो. तसेच मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवेन म्हणून. पण आताचे मिंदे हे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्यासोबत गेल्याची खोचक टीका केली. तसेच मी मुख्यमंत्री झालो, आता तर माझ्याजवळ काहीच नाही. पण मी कधी हिंदूत्व सोडलं का? असे एखादं तरी उदाहरण दाखवून द्या असे आवाहन करत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. त्याचबरोबर आमचं हिंदूत्व हे शेंडी जानव्याचं नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर टीका करताना म्हणाले, कोण म्हणतं कांदे विकले जात नाहीत. मागील वर्षी कोटी रूपयांचे कांदे विकले गेले त्या खोक्यासाठी ते तिकडे विकले गेल्याची खोचक टीकाही केली.

तसेच राज्यात अवकाळी पाऊस झाला, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु शेतकरी राज्यावर इतके मोठे संकट आलेले असतानाही राज्याचे कृषी मंत्री आहेत कुठे असा सवाल करत त्यांना रात्रीच्या अंधात शेतपीकांची पाहणी करण्याची दिव्यदृष्टीचा साक्षात्कार झाल्याची उपरोधिक टीका करत महिलेला शिवी देणारा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नेहमीच होतात सारखं बेजाबदार विधान करणारा व्यक्ती मंत्री पदावर कसा राहू शकतो असा सवालही त्यांनी शिंदे गटाला केला.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *