Breaking News

राजन विचारेंनी आनंद दिघेंचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंवर टीका, कर्तृत्व सिध्द करावं लागतं आणि… शाखा बळकाविल्यावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्यात येत आहेत. होळीच्या दिवशी ठाण्यात शिंदे गटाकडून शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यात आली होती. तेव्हा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावरून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला इशारा देत आनंद दिघेंचा संदर्भ देत कर्तृत्व असावं लागतं आणि त्याला लोकांचा पाठिंबा असावा लागतो अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले, ज्या शिवसैनिकांनी शाखेमध्ये जीवाचं रान करून तुम्हाला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री केलं. त्या शिवसैनिकांच्या शाखा तुम्ही ताब्यात घेत आहात. शाखा म्हणजे आमचं घर, मंदिर आहे. जर तुम्ही शाखा उद्ध्वस्त करणार असाल, तर जनता तुम्हाला नक्कीच उत्तर देईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्याचं समोर आलं आहे. त्याबद्दल बोलताना राजन विचारांनी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे सर्व या महाराष्ट्रात एकदाच होऊन गेले. कोणी कितीही नक्कल केली, तरी त्यांचा जागा कोणी घेऊ शकत नाही. हे सर्वजण आपले आदर्श आहेत. त्यांचे विचार तुम्ही कुठे नेऊन ठेवले आहेत. त्यांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहे.

आनंद दिघेंनी आनंद आश्रमातून अनेक लोकांची काम केली आहेत. त्या आनंद आश्रमाला तुम्ही स्वत:च नाव दिलं. कर्तुत्व हे सिद्ध करावे लागतं. कर्तुत्वासाठी जनतेची साथ असावी लागते. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवून देईल. जर हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही राजन विचारेंनी दिले.

Check Also

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *