Breaking News

संक्रातीच्या आदित्य ठाकरेंनी ट्विट करत दिल्या खोचक शब्दातून शिंदे-फडणवीसांना शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्र हिताचं बोला

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेल्या मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या निविदेतील घोटाळा उघडकीस आणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आज नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख टिल्ल्या करत चौकशी सुरु झाल्यानंतर टिल्ल्या शांत बसल्याची टोला लगावला. परंतु आदित्य ठाकरे यांनी मकर संक्रातीनिमित्त आज ट्विटरवरून शुभेच्छा देत पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे आपल्या ट्विटवर म्हणाले, तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला!, महाराष्ट्रात सुरु असलेल्या द्वेषाच्या राजकारणामुळे सर्रास बेताल विधानं होत आहेत. महापुरुषांचे अपमान होत आहेत. स्त्रियांचा अपमान होत आहे. सामाजिक वातावरण गढूळ होत आहे आणि या साऱ्यात जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. द्वेष आणि खोटेपणा सोडा, स्वच्छ राजकारणाने मनं जोडा असा टोला लगावत खोचक आवाहन केले.
मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना शिवसेनेत नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. सुकलेली पाने गळून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पआयुचे आणि खोके सरकार दोन ते तीन महिन्यात कोसळणारच अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती.

४० जणांनी व्ही.आर.एस. घेतला असून त्यांचे चेहरे पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

 

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *