Breaking News

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय डॉक्टरांच्या निगराणीखाली प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांचा निर्णय

जगभरातील आदराचे स्थान मिळविलेल्या आणि अनेक घडामोडीनंतरही आपले राणी पद टिकवून ठेवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नसले तरी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बर्मिगहॅम पॅलेसच्यावतीने देण्यात आली आहे.

मागील ऑक्टोंबर महिन्यापासून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती ठीक नाही. त्यातच त्यांना चालता येत नाही आणि उभे ही राहता येत नाही. त्यामुळे त्या झोपूनच आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची सातत्याने तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे. एलिझाबेथ द्वितीय या ९६ वर्षाच्या आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या राजकिय सल्लागाराबरोबर एक बैठक घेत होत्या. परंतु त्यांना होत असलेल्या प्रकृती अस्वस्थामुळे अखेर त्यांना बैठक मध्येच थांबवावी लागली.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि राणी एलिझाबेथ यांना आराम करण्याचा सल्ला दिला.

तसेच विद्यमान परिस्थितीत एलिझाबेथ द्वितीय यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणे आवश्यक असल्याचे मत बर्मिंगहॅम पॅलेसच्या डॉक्टरांनी सांगत त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे पॅलेसच्यावतीने सांगण्यात आले.

विशेष म्हणजे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जोन्हासन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून लिझ स्ट्रॉस यांना नियुक्त केले.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या सध्या बालमोरल केनसिग्टन येथे मुक्कामी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही पॅलेजच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान एलिझाबेथ यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच प्रिन्स चार्लस आणि विल्यम हे कनसिंग्टनला रवाना होत आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *