Breaking News

फुटीर आमदारांच्या मतदारसंघात आता शिवसेनेकडून बांधणी; सुरुवात सोलापूरातून शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातून सुरुवात

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांसह १० समर्थक अपक्षांनाही सोबत नेले. त्यामुळे  आता शिवसेनेत होणारी पडझड थांबविण्यासाठी शिवसेनेकडून बांधणीचा प्लॅन आखला असून बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी बंडखोरांच्या मतदारसंघात उध्दव ठाकरे यांना मानणाऱ्या समर्थकांची सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत पहिली सभा काय झाडी, डोंगार आणि हॉटील ओके मध्ये या वक्तव्याने राज्यात एकदम प्रसिध्दीच्या झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघापासून सुरुवात करण्यात आलेली आहे.

येत्या रविवारी शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत हे शहाजीबापू पाटील यांच्या घरच्या मैदानात येणार आहेत. तसेच जाहिर सभाही घेणार आहेत.

राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडून शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर अडचणीत आलेला पक्ष सावरण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना लक्ष्य करण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. येत्या रविवारी दुपारी बारा वाजता खासदार विनायक राऊत हे सांगोल्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित जाहीर सभेत आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडणार आहेत. रांगड्या स्वभावाचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुध्दा फर्डे वक्ते आहेत. ते आपल्या माणदेशी भाषेतून खासदार राऊत यांच्यासह शिवसेनेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याचीही सार्वत्रिक उत्सुकता आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सोलापुरात दाखल होऊन शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तीन विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या बांधणीचा आढावा घेतला. मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस आणि पंढरपूर येथेही शिवसेनेच्या आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *