Breaking News

शाहरूख खान म्हणाला, मातृभूमीवर प्रेम करता याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांना ताम्रपट मिळाले

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान जितका भारतातच नव्हे तर तो जगभरात प्रसिद्ध आहे. मेहनती कलाकार म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. जितका तो प्रसिद्ध आहे तितकाच तो वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येतो. त्याच्या आगामी चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. परंतु देशभक्ती आणि भारतीयत्वाबद्दल आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडीलांबद्दल पहिल्यांदाच मते त्याने व्यक्त केली. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख खानने सडेतोड मते मांडली.

शाहरुख जसा आपल्या संवाद फेकीसाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा हजरजबाबीपण अनेकांना भावतो. त्याच्या राष्ट्रप्रेमावर देखील अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होतात. माय नेम इज खान चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळेस आयपीएल स्पर्धेचा लिलाव सुरु होता आणि तेव्हा आयपीएलने पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. यावर शाहरुखने आयपीएलवर टीका केली होती. ताबडतोब, शाहरुखच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या चित्रपटाला (माय नेम इज खान) मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी रॅली काढली.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मुलाखतीत तो असं म्हणाला की ही एक गोष्ट आहे जी कोणत्याही भारतीयाला (त्याच्या देशभक्तीवर) प्रश्न विचारले जाऊ नये. तुम्ही तुमच्या मातृभूमीवर प्रेम करता याच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे, मुळात माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. इंग्रजांच्या विरोधात लढले म्हणून त्यांना ताम्रपत्र मिळाले होते. याबद्दल सविस्तर बोलताना शाहरुख म्हणाला, “कदाचित मी माझ्या आयुष्यात तडजोड केली आहे आणि मी ती कधीच नाकारणार नाही पण मला माहीत आहे की मी चांगला वागलो आहे. नागरिकांनो, मी माझा कर भरतो, मी कायद्यानुसार ठीक राहण्याचा प्रयत्न करतो.

खरं तर, शाहरुख एवढ्यावरच थांबला नाही तो पुढे म्हणाला मी पुन्हा नम्रतेने सांगतो की ‘आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. जर मी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाचे नाव घेतले असेल तर त्यात काय नुकसान आहे? हे मला कळले नाही. मला अनेकजण सांगत आहेत तू तुझं मत मागे घे पण मला कळत नाही यात मागे घेण्यासारखे आहे तरी काय? म्हणून, तुमच्या शोमध्ये मी म्हणेन ‘जगातील कोणत्याही देशाशी भारताने मैत्री करू नये, फक्त माझा चित्रपट आनंदाने प्रदर्शित होऊ द्या’.

शाहरुखचे तीन चित्रपट सध्या चर्चेत आहेत. पठाण हा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर राजकुमारी हिरानी यांचा डुंकी आणि अॅटली यांचा जवान, हे दोन चित्रपट त्याच्याकडे आहेत. शाहरुखचे चाहते देखील त्याच्या चित्रपटांची वाट बघत आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *