Breaking News

सरनाईक गुवाहाटीला गेल्याचा किस्सा सांगण्याऱ्या संजय राऊत यांनी दिली ‘नवी’ माहिती मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती

काही दिवसांपूर्वी दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, मला प्रताप सरनाईक यांचा फोन आला होता. त्यावेळी ते दिल्लीत गेले होते. तेथे सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांना थेट अमित शाह यांच्याकडे घेवून गेले. तेथे भेट झाल्यानंतर अमित शाह यांनी ईडीच्या सगळ्या केसेस मागे घेणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी सांगितली. त्यानंतर सरनाईक यांनी आपणही आता सूरत मार्गे गुवाहाटीला जात असल्याचे सांगितल्याचा भंडाफोड केला.

त्यानंतर आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही असा टोला टोला शिंदे गटाला आणि भाजपाला लगावला. तसेच ईडी नावाची तलवार शिवसेनेच्या आमदारांवर मानेवर ठेवल्यामुळेच त्यांनी बंड केला असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला.

विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपकाही एकनाथ शिंदे यांच्यावर या परिपत्रकामध्ये ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात काल रात्री शिवसेनेनेकडून तशा आशयाचे परिपत्रक जारी केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद आहे. तसेच लोकांना फसवणे ही भाजपाची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप करत

भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे. त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडीने शुक्रवारी सुमारे १० तास चौकशी केली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. यापूर्वी राऊत यांनी समाज माध्यमांवर ईडी कार्यालयाबाहेर कोणीही जमा होऊ नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. राऊत यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारात ईडी कार्यालयात गेलेले संजय राऊत रात्री १० च्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *