Breaking News

भाजपाकडून द्रोपदी मुर्म तर विरोधकांचे यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुर्म झारखंडच्या माजी राज्यपाल

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या पदासाठी बिगर भाजपेतर पक्षाकडून योग्य उमेदवार मिळावा यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर आज झालेल्या बैठकीत भाजपाचे माजी केंद्रिय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्ंहा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर भाजपाकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्म यांचे निश्चित करत त्याची आज अपौचारीक घोषणा करण्यात आली.

भाजपाकडून द्रोपदी मुर्म यांच्या नावाची घोषणा करण्याआधी आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर नड्डा यांनी मुर्म यांच्या नावाची घोषणा केली.

तर मागील तीन दिवसाहून अधिक काळ भाजपातेर पक्षाकडून सातत्याने नवी दिल्लीत बैठकांचे आयोजन करण्यात येत होते. याबैठकांमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव सुचविण्यात आले होते. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु फारूख अब्दुला यांनीही निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपेतर पक्षाकडून कोणता उमेदवार निश्चित होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. परंतु आज अखेर तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यास काँग्रेससह सर्वच पक्षांनी मान्यता दिली.

द्रोपदी मुर्म या आदिवासी समाजातील असून त्या ईशान्य भारतातील आहेत. यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलेले आहे. तसेच त्यांच्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना झारंखडच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

तर यशवंत सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरुवातीला परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. मात्र कालांतराने त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली. तर त्यांच्याकडील परराष्ट्र मंत्रालयाचे खाते जसवंतसिंग यांच्याकडे देण्यात आले होते. केंद्रात मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर जून्या अनेक नेत्यांना बाजूला सारण्यात आले. तर अनेकांना तिकिटेच नाकारण्यात आली. त्यात यशवंत सिन्हा यांचे नाव अग्रभागी होते. मोदी सरकारने घेतलेल्या अनेक चुकिच्या निर्णयावर यशवंत सिन्हा यांनी सातत्याने टीका केली. तसेच त्यांनी मध्यंतरी एका संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *