Breaking News

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा ? भावना विवष चर्चा झाल्याचा दावा

राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांच्या मदतीने शिवसेनेत बंडाळी केली. आता ही बंडाळी क्षमविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे रविंद्र फाटक हे सूरत येथे जावून बंडखोर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सूरतमधील ले मेरिडीयन हॉटेलमध्ये एक तास चर्चा झाली. त्यावेळी नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात फोनद्वारे संवाद घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी फोनवरील संभाषणात उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत या समोरासमोर बसवून चर्चा करून जे काही असतील ते गैरसमज दूर करू असे आवाहन केले. तर एकनाथ शिंदे यांनी जे काही झालेय त्यामुळे मी पक्षापासून दूर राहणेच चांगले असे मत व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं देखील समजत आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्ती केल्याची माहिती समजत आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मला मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपात युती व्हावी, यात गैर काय आहे? मी अद्याप कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही. कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. तरीही माझ्यावर कारवाई का झाली? असे अनेक सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याची माहिती समजत आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे आपली अधिकृत भूमिका मांडणार असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मुंबईत या, आपण समोरासमोर चर्चा करू, चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, सर्वकाही सुरळीत होईल, तुम्ही चिंता करू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याचं समजत आहे.

दरम्यान दिवसभर घडलेल्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे चांगलेच दुखावले गेले असून शिवसेनेपासून फार दूर गेल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सूरतेहून एकनाथ शिंदे स्वत:ची सुटका करून घेत शिवसेनेत स्वगृही परतणार की, स्वत:चा झेंडा घेवून महाराष्ट्रात परतणार याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तुर्तास एकनाथ शिंदे हे शिवसेनेपासून फार दूर गेल्याचे दिसून येत आहे.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत जप्त केले ४,६५० कोटी रूपये

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) १५ एप्रिल रोजी सांगितले की, गेल्या ७५ वर्षांतील निवडणुकीदरम्यान ड्रग्ज आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *