Breaking News

राणे पिता-पुत्राला अटी व शर्तींवर आधारीत जामीन मंजूर दिशा सालियन बदनामी प्रकरणात दिंडोशी न्यायालयाचा निर्णय

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तीच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सालीयन कुटुंबियाने केलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना आज दिंडोशी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.

राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो मंजूर करण्यात आला.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले असून यापुढेही जिथे अन्याय होईल तेथे आम्ही आवाज उठवणार असल्याचे वक्तव्य केले.

नारायण राणे आणि मला दिशा सालीयन या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे. काही अटी व शर्तींवर आम्हाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीमध्ये लोकप्रतीनीधींना जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाऱाला अबाधित ठेवण्याचे काम न्यायालयाने केले. महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असे सांगत नितेश राणे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले.

त्यानंतर पुढे बोलताना म्हणाले की, दिशा सालियन यांच्या आई-वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असं आम्ही ऐकतोय. त्या दिवशी महापौर दिशा सालियन यांच्या घरी गेल्या. त्यानंतर ज्या हालचाली झाल्या, त्याच्यानंतर आज न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. यापुढेही ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तिथे अन्यायाविरोधात आवाज उचलण्याचे काम नारायण राणे तसेच मी करणार आहोत. पांडेजी आता आलेले सीपी आहेत. त्यांना एक यादी दिलेली आहे. त्या यादीवर त्यांना टीकमार्क करायचे आहे. त्यानुसार आता प्रत्येकावर एफआरआय दाखल केला जातोय असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस आल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशा सालीयन हिच्यावर तिच्या मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचा आरोप करत त्यावेळी महाविकास आघाडीतील एक मंत्री उपस्थित होता. तसेच त्यांच्या संरक्षणातच हेकृत्य झाल्याचा गौप्यस्फोट केला.

दिशा सालीयन हिचा पोस्ट मार्टेम अहवाल अद्याप आलेला नाही. दिशा ज्या इमारतीत गेली त्या दिवशीची इमारतीच्या रजिस्टरची पाने फाडण्यात आली आहेत. ती पाने कोणी आणि का फाडली? असा सूचक सवाल करत त्याबद्दलची काही माहिती आम्हाला मिळालेली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन हिच्या अनुषंगाने ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे सालीयन कुटुंबियांने यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पेडणेकर यांनी सदरची तक्रार महिला आयोगाकडे केली. त्यानंतर महिला आयोगाच्या आदेशान्वये मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *