Breaking News

स्व.वाजपेयी यांच्या जन्मदिवस आणि ख्रिसमसनिमित्त मोदींनी केल्या तीन मोठ्या घोषणा मुलांचे लसीकरण, फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोस

मराठी ई-बातम्या टीम

देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवसानिमित्त आणि ख्रिसमस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी रात्री उशीरा देशातली जनतेशी संवाद साधत मुलांच्या लसीकरण, फ्रटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचारी यांच्यासह को-मॉर्बिडीटी असलेल्यांचे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्यात येणार आहे. तर १० जानेवारी २०२२ रोजीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. याशिवाय याच तारखेपासून को-मॉर्बिडीटी असलेल्या रूग्णांनाही १० जानेवारी २०२२ पासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तर ज्यांचे वय ६० पेक्षा जास्त असेल तर त्यांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बुस्टर डोस घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी यापूर्वीच देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. देशातील विशेषत: पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या राज्यांनी अर्थात गोवा, उत्तराखंड आदी राज्यांनी पहिला डोस राज्यातील १०० टक्के जनतेला दिल्याचे सांगत देशातून कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरीकांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे असून कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने या आजाराचा सामना करण्यासाठी या विषाणूची बाधा मुलांना होण्याचा धोका लक्षात घेवून ९० हजार बेड्स तयार ठेवण्यात आले आहे. तर १५ लाख बेड्स विलगीकरणासाठी सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर कोरोनावरील नाकाद्वारे लसमात्रा देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार असून नागरीकांना जगातील पहिली डिएनए लसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *