Breaking News

तळीये गावातील दरडग्रस्तांसाठी गुजरातमधून घरे येणार सातही वाड्यांमधील २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार - गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

मुंबई: प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे कोकणातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी होत गावच गायब झाले. तसेच सात वस्त्यांमधील घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे त्या सर्व बाधितांना घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र ही सर्व घरे सध्या गुजरातमधून तयार होवून येणार असल्याची माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गुजरातमध्ये प्री-कॅब पध्दतीची मोठ्या प्रमाणावर घरांच्या वसाहती बांधण्यात आल्या आहेत. तसेच या घरांचा खर्च कमी असून ही घरे नट-बोल्टने जोडून तयार केली जातात. तसेच त्याच्या भिंतीही तयारच असतात. आता तळीये येथ दरडग्रस्तांना हीच घरे बांधून देण्यात येणार आहेत. सध्या अशा पध्दतीची घरे तयार करण्याचे काम गुजरातमध्ये सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

या घरांचे दोन नमुने लवकरच तळीये या गावी लवकरच सॅम्पल घरांच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. जेणेकरून बाधितांना त्यांना देण्यात येणारी घरे कशा पध्दतीची असतील याची माहिती होण्यास मदत होईल. यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत ‘प्री-फॅब’ पद्धतीने पूर्ण करावी, असे सांगितले.

तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी निर्देश देत तळीये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करण्यास सांगितले.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.

प्री-फॅब घर असे असते-

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *