Breaking News

Tag Archives: aditi tatkare

सरकारने दिले धर्मादाय रूग्णालयांना हे आदेश नियमाप्रमाणे १० टक्के गरिब रूग्णांना उपचार द्या मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तटकरे

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये १० टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य …

Read More »

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवायचं नाशिक एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लब, खारघर येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे …

Read More »

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकणात १० लाख कुटुंबाची पाहणी कोकण विभागाचे काम अव्वल –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नवी मुंबई : प्रतिनिधी कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक …

Read More »

हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करायचाय थांबा परवानग्यांची संख्या कमी होणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : प्रतिनिधी हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ …

Read More »

राज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा; या वर्गातील खेळाडूंना शासकिय नोकरी शासकीय सेवेत थेट संधी मिळालेल्या खेळाडूंचा उपयोग नवीन खेळाडू घडवण्यासाठी व क्रीडाविकासाठी करणार

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं, या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी, राज्याच्या क्रीडाविकासासाठी व्हावा, यादृष्टीने सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

महाडमधील त्या इमारतीतील ७८ व्यक्ती सुखरूप तर मृतकांची संख्या १० वर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

महाड: प्रतिनिधी येथील तारिक गार्डन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९७ व्यक्तींपैकी ७८ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून ते सुखरूप आहेत. या दुर्घटनेत संध्याकाळपर्यत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, …

Read More »

राजशिष्टाचार मंत्र्यांकडूनच शिष्टाचाराचे उल्लंघन पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठीच्या समितीचे आदित्य ठाकरे बनले अध्यक्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोकशाहीप्रणालीत लिखित कायद्यांबरोबरच लोकाशाही मुल्यांना अर्थात संकेताना फार महत्व असते. त्यामुळे कोणत्याही समितीची स्थापना करताना किंवा त्याच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना अनुभवी आणि तज्ञ असलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची निवड केली जाते. मात्र राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठी एका समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मात्र …

Read More »

निसर्ग चक्रीवादळग्रस्त १२ महाविदयालयांना राष्ट्रवादी वेल्फेअरकडून १०० संगणक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केले सुपूर्द

मुंबई: प्रतिनिधी शरद पवारांचा पहिला आग्रह हा नुकसान झालेल्या भागातील पीडितांना मदत देण्याचा असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील १२ महाविद्यालयात १०० संगणक आज वाटप करण्यात आले असून हा टप्पा इथेच संपत नसून पुढील काळात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टतर्फे अशी मदत केली जाणार असल्याची ग्वाही …

Read More »

गणेशोत्सव येतोय ! कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने करा आढावा बैठकीत अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात अनेक चाकरमानी जातात. मात्र यंदा कोरोनामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र एसटी सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक जण खाजगी बस आणि गाड्यांनी कोकणात जातात. कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या …

Read More »

भूमिपुत्रांना महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून नोकऱ्या मोबाईल ॲपही विकसित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून …

Read More »