Breaking News

अजित पवार यांनी भर शिबीरात, कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांना लगावला मिश्किल टोला

कर्जत या थंड हवेच्या ठिकाणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंथन शिबीराचा आज शेवटचा दिवस असल्याने समारोपाचे भाषण गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे करत असताना त्यांच्या भाषणा दरम्यान, एका कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणाबाजीवरून आणि मुंबईतील पक्ष कार्यालयात बसून राहणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्याना आणि मंत्री आदिती तटकरे यांना मिश्किल टोला लगावला.

अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या नेत्यांसाठी आयोजित मंथन शिबीरात समारोपाचे भाषण करताना मध्येच त्यांच्या एका युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने डायसच्या खाली ठेवण्यात आलेला लॅपल माईक उचलून त्यांच्या जॅकिटला लावला. त्यावेळी अजित पवार मिश्किलपणे म्हणाले की, हा बाबा कुठे कुठे काय लावील काय सांगता येत नाही. नेमक्या त्याचवेळी मंथन शिबीराला उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने अजित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा अजित दादा आदी घोषणा केल्या.

त्यावेळी अजित पवार म्हणाले, अरे तुझं नाव काय, तुझ्या तालुक्याच नाव काय असा सवाल त्या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्याला केला. त्यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बेंबीच्या देठापासून जो घोषणा देतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो त्या कार्यकर्त्याचं त्याच्या गावात, गल्लीत, वार्डात काहीच नसतं हे सत्य आहे. तो राज्यतला, राष्ट्रीय नेता असतो पण त्यांच्या गावाचा सरपंच भलताच असतो आणि हा राष्ट्रीय नेत्यांसोबत असतो. तसेच त्यांच्या गावात त्यालाच कोणी ओळखतं नसतो अशी मिश्किल टोला लगावला लगावला.

त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना, अजित पवार पुढे म्हणाले की, माझ्या शपथविधी सोहळ्याला एकमेव उपस्थित राहिलेल्या महिला नेत्या आदिती तटकरे या काहीच काम करत नाहीत असे नाही. पण त्यांनी युवती संघटन वाढविण्याच्यादृष्टीने काम केलं पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडविण्याठी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगत इथं रूपाली चाकणकर आहेत. त्यांनीही महिलांचे संघटन उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगत हळूच राजकिय भाषेत चिमटा घेतला.

अजित पवार पुढे म्हणाले, आपल्याला फार कमी कालावधी राहिलेला आहे. साधारणतः मार्च महिन्यात निवडणूकांच्या आचारसंहिता जाहिर होतील. त्यामुळे पक्षवाढीसाठी सर्वांना अंग झटून काम करावे लागणार आहे. फक्त मुंबईतल्या मंत्रालयासमोरील कार्यालयात बसून चालणार नाही तर त्या पदाधिकाऱ्यांनी फ्रंटला दिसले पाहिजे अशी समजही उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पक्ष नाव आणि चिन्ह आपल्याला मिळेल का, जर मिळालं तर त्यांना काय मिळेल मग आपलं काय होईल या असे म्हणत पक्ष नाव आणि चिन्ह या कोर्टाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यासाठी योग्य माणसं आहेत. तसेच चिन्ह आणि पक्ष नाव देण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे उगाच नको तिथे नाक खुपसू नका असा सज्जड दमही पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *