Breaking News

या दिवसापासून लागू शकतो लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून रात्रो ८.३० वाजता अधिकृत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता द्सतुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्री व्यक्त करत आहेत. तसेच या अनुषंगाने वैद्यकिय सुविधा आणि यंत्रणेचा आढावाही घेण्यात आला. यापूर्वीच राज्यात दर आठवड्याला वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना आता सलग १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून १४ एप्रिल रोजी अर्थात शुक्रवारी २०२१ रोजीच्या रात्रो ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली. तसेच लॉकडाऊनची अधिकृत सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून आजच रात्रो ८.३० वाजता अधिकृतपणे जाहिर करण्यात येणार आहे.

सोमवारी आणि रविवारी सलग दोन दिवस टास्क फोर्स, मंत्रालय प्रशासनाती प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्यानंतर १४ एप्रिल २०२१ रोजी पासून लॉकडाऊन तयार करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. तसेच या कालावधीसाठी नियमावली तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले होते. त्यानुसार लॉकडाऊन काळासाठी नियमावली तयार करण्याचे कामही आता पूर्ण झाले आहे. मात्र गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या अचानक लॉकडाऊनच्या धर्तीवर न करता नागरीकांना एक दिवसाचा कालावधी राज्य सरकारने देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार उद्याचा पूर्ण दिवस देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कालावधीत नागरीकांना कोणत्या सोयी-सुविधा द्यायच्या कोणत्या नाही याबाबत काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील नोकरदार आणि अत्यावश्यक दुकाने सुरु राहणार आहेत. तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर बंधने घालण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या कडक निर्बंधात भाजीपाल्याचे मार्केट वगळता इतर दुकाने जशी बंद ठेवण्यात आली. त्याच धर्तीवर इतर सर्व दुकानेही बंद राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

दरम्यान मुख्यमंत्री हे दिड तासानंतर अर्थात रात्रो ८.३० वाजता अधिकृतपणे लॉकडाऊनबाबत माहिती देणार आहेत. त्यावेळी इतरही अनेक गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाहिर करणार आहेत.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *