Breaking News

संदीपसिंह आणि भाजप, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपसिंहने कोणाला ब्रिफिंग केले? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

सुशांतसिंग राजूपत प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपीक बनवणाऱ्या संदीपसिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदिपसिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे. तसेच १४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपाच्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे म्हणत संदीपसिंह आणि भाजपा यांच्यातला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला.

संदिपसिंहच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता त्याच्या कंपनीला २०१७ मध्ये ६६ लाखांचे नुकसान झाले होते, २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा तर पुन्हा २०१९ मध्ये ४ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसते. अशा तोट्यातील कंपनीबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार कसा काय केला? ही कंपनी पैसे कोठून आणणार होती? मोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीपसिंहवर भाजपा एवढा मेहरबान का झाला ? या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत अशी मागणी त्यांनी

संदिपसिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते? याचीही स्पष्टता अजून होत नाही. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत अशा व्यक्तीची शहानिशा न करताच त्याच्या कंपनीशी करार कसा काय केला हेही आश्चर्यकारक आहे. हे सर्व पाहता सखोल चौकशी केल्यास यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *