Breaking News

पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून ऑनलाईन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील १० वी आणि १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून १० वी आणि १२ वी नंतर पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर/ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदविका प्रवेश परिक्षेसाठी ३३६ सुविधा केंद्राची निवड तर १२ वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी २४२ सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रावर प्रत्यक्ष जावून कागदपत्रांची छानणी करण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी जाणे टाळण्यासाठी ई-स्क्रुटनी संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची पाळी येणार नाही. तसेच कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *