Breaking News

दोन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती या दोघांची सेवा नियमित करणार का? कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी

सेवाज्येष्ठतेनुसार महसूल केडरमधील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती देताना राज्य सरकारने दोन सेवानिवृत्त झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती दिल्याची माहिती पुढे आली असून आता या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यातील महसूल आणि मंत्रालय केडरमधील २३ अधिकाऱ्यांना  २०१८ च्या सेवाज्येष्ठतेनुसार आयएएस पदी बढती देण्यात आली. या २३ जणांच्या यादीमध्ये महसूल विभागात कार्यरत राहीलेले श्यामसुंदर पाटील यांनाही पदोन्नती देण्यात आली. मात्र श्यामसुंदर पाटील हे मागील महिन्यात मंत्रालयातून सेवानिवृत्त झाले. राज्य सरकारच्या नियमानुसार सेवानिवृ्त होण्यासाठी ५८ वर्षाची वयोमर्यादा आहे. तर आयएएस अधिकाऱ्यांसाठी ६० वयोमर्यादा आहे. मात्र श्यामसुंदर पाटील हे उपसचिव पदावर असतानाच वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. तर प्रमोद यादव हे ही उपसचिव पदी अर्थात राज्य सरकारच्या सेवेत असतानाच वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने मे महिन्यात दोघेही सेवानिवृत्त झाले. आता त्यांना पुन्हा शासन सेवेत घेणार की त्यांना सेवानिवृत म्हणून तसेच ठेवणार याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली.

याबाबत श्यामसुंदर पाटील यांच्याशई संपर्क साधला असता ते म्हणाले की, जरी आम्ही सेवानिवृत्त झालेलो असलो तरी आम्हाला मिळालेल्या आयएएस पदावरील प्रमोशनचा लाभ घेता येणार आहे. तशी तरतूद त्या नियमावलीत आहे. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही.

Check Also

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *