Breaking News

देशभरातील ४५ नयनरम्य स्थळांची सफर घडवणार ‘सॉरी’ सात राज्यांमधील प्रार्थनास्थळांच्या मनमोहक लोकेशन्सचा नजराणा

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येक सिनेमाची आपली एक खासियत असते. मुरलेले कलाकार हा एखाद्या सिनेमाचा प्लस पॅाइंट असतो, तर एखाद्या सिनेमाचा दिग्दर्शक अनुभवी असतो… एखाद्या सिनेमाचं संगीत कर्णमधूर असतं, तर एखाद्या सिनेमाचं कथानक मन मोहून टाकतं… पण काही सिनेमे यापेक्षा खूपच वेगळे असतात. हे सिनेमे रसिकांना सिनेमागृहात बसून जगभराची सफर घडवतात. ‘सॉरी’ हा आगामी मराठी सिनेमा प्रेक्षकांना अशाच एका जादूई सफरीवर घेऊन जाणार आहे. हा सिनेमा देशभरातील सात राज्यांमधील विविध ४५ लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आला आहे.

वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सॉरी’ या मराठी सिनेमाची निर्मिती योगेश दत्तात्रय गोसावी यांनी केली आहे. मनोरंजनासोबतच काहीतरी बोधप्रद असा विषय रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या योगेश गोसावी यांनीच ‘सॉरी’चं दिग्दर्शन केलं असून लेखन आणि संकलनही केलं आहे. या चित्रपटाची कथा एका नाटकाच्या लेखकाभोवती गुंफण्यात आली असून याचं चित्रीकरण देशभरातील सात राज्यांमध्ये करण्यात आलं आहे. यात जामा मस्जिद, पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर, अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्त्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. सात राज्यांमधील ४५ लोकेशन्सवर चित्रीत करणं हे रसिकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेलं नसून, कथानकाची गरज असल्याचं दिग्दर्शक योगेश गोसावी यांचं म्हणणं आहे. याबाबत ते म्हणतात की, कथानकातील एक महत्त्वाचा धागा पकडूनच या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. कलाकारांपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्वांनीच आपापली कामा प्रामाणिकपणे केल्याने पडद्यावर जे चित्र दिसेल ते प्रेक्षकांना आकर्षित करणारं ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

सौरभ चिरमुल्ला, सुलक्षणा राय, समृद्धी पाचे, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, डॉ. संजीवकुमार पाटिल आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्या पिढीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आजच्या पिढीलाच नव्हे तर कामाच्या आहारी जाणाऱ्या सर्वांसाठीच ‘सॉरी’ हा सिनेमा म्हणजे घोक्याची घंटा आहे. महिकापुर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून दिपीका अविनाश फत्तेपूरकर लाईन प्रोडयूसर आहेत. छायांकनाची जबाबदारी हर्षद मुजुमदार यांनी सांभाळली असून विनोद वाळूंज आणि विजय जोगदंडे या जोडगोळीने ‘सॉरी’साठी कलादिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील गीतांना श्रीरंग ढवळे यांनी संगीत दिलं असून वेशभूषा माही कपूर यांची आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *