दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. आता सीझन ८ देखील खूप चर्चेत आहे. शोच्या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसल्या आहेत. दोघांनी सेटवर एकत्र खूप धमाल केली. सोशल मीडियावरही या एपिसोडची जोरदार चर्चा होत आहे. ‘कॉफी विथ करण ८’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी अनेक खुलासे केले आहेत.
शोच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाल्यापासून सारा आणि अनन्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दरम्यान, अनन्या पांडेनेही सारा अली खानशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. हे ऐकून चाहत्यांनाही हसू फुटलं. रात्री ३ वाजता सारा तिला चौपाटीवर कशी घेऊन गेली हे अभिनेत्रीने सांगितलं होतं. मात्र, त्यादरम्यान पोलिसांनी तिची गाडी अडवली आणि तिला तिथे जाऊही दिलं नाही.
कॉफी विथ करण सीझन ८ च्या प्रोमोमध्ये, अनन्या पांडेने सारा अली खानशी संबंधित एक मजेदार घटना चाहत्यांसोबत कशी शेअर केली हे दाखवण्यात आलं आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, करण जोहर पार्टीतून घराबाहेर पडताच सारा त्याला रात्री ३ वाजता चौपाटीवर घेऊन गेली. जवळपास सकाळ झाली होती. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या पोलिसांनी दोघांना आत जाऊ देण्यास नकार दिला होता. तिचा मुद्दा पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी साराने त्यांना सांगितलं की, बघा, अनन्या पांडे कारमध्ये बसली आहे. प्लिज आम्हाला जाऊ द्या असा किस्सा तिने यावेळी सांगितला होता.