Breaking News

इंडिया आघाडीची समन्वय समिती जाहिरः या १२ संपादक-पत्रकारांच्या कार्यक्रमावर बंदी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली बैठक

आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडिया आघाडीची समन्वय समिती आज जाहिर करण्यात आली. या समन्वय समितीत काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना स्थान देण्यात आले आहे.

इंडिया आघाडीच्या समन्वय समिती आणि त्यातील सदस्यांची घोषणा नवी दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यात काँग्रेसचे के सी वेणूगोपाल, डिमकेचे टी आर बालू, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आपकडून राघव चढ्ढा, समाज पार्टीचे जावेद अली खान , जेडीयुचे संजय झा, भाकपचे डी राजा, नॅशनल काँन्फरसचे ओमरअब्दुला, काँग्रेसचे बन्ना गुप्ता, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश करण्यात आला आहे.

यापुढील सर्व इंडिया आघाडीच्या बैठका आणि त्याचे नियोजन या समन्वय समितीकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या समितीची आता पुढील बैठक मध्य प्रदेशातील भोपाळ येथे होणार आहे.
मात्र या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला नाही. वास्तविक पाहता इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात येईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु शरद पवार गटाकडून कोणाचाच समावेश करण्यात आला नाही.

इंडिया आघाडीकडून या १२ टिव्ही वरील अॅकरच्या कार्यक्रमात भाग घेणार नाही

आदिती त्यागी, अमन चोपडा, अमिष देवगन, आनंद नरसिमह्न, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पराशर, रूबिका लिकायत, शीव अरूर, सुधीर चौधरी, सुशांत सिन्हा या अॅंकर कम संपादकांच्या टिव्हीवरील चर्चेत भाग घेणार असल्याचे इंडिया आघाडीच्यावतीने जाहिर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *