Breaking News

गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट आणि टेस्टी स्पाँजी केक फक्त अर्धा कप गव्हाच्या पिठापासून बनवा सॉफ्ट केक

सध्या कोणत्याही कार्यक्रमाला विशेष करून वाढदिवसाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, पार्टी, एनिवर्सरी अशावेळेस केक कट करतो. पण केक हा सर्वांनाच लागतोच. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, पार्टी, एनिवर्सरी अशावेळेस केक कट करतो. पण केक हा सर्वांनाच लागतोच.

बाजारात अश्या वेळी मिळणारे केक्स खूप महाग असतात शिवाय त्यात जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा असतो. हल्ली बाजारात कप केकची मागणी खूप वाढू लागली आहे, बच्चे कंपनीला हा मग केक फारच भुरळ घालताना दिसत आहे, अश्या वेळी बाजारातला मैद्याने बनलेला केक लहान मुलाना देण्यापेक्षा घरीच बनवूया गव्हाच्या पिठाचा स्पॉंजी आणि टेस्टी केक.

दही – पाव कप, गूळ – पाव कप, तूप/तेल – २ चमचे, गव्हाचे पीठ – अर्धा कप, कोको पावडर – 1 मोठा चमचा, बेकिंग पावडर – अर्धा चमचा, बेकिंग सोडा – चिमूटभर, दूध – गरजेनुसार, चॉकलेट्स – गरजेनुसार इत्यादी पदार्थाची आवश्यकता आहे. हा स्वादिष्ट कप केक बनवण्यासाठी सर्वात प्रथम आधी दही, गव्हाचं पीठ, गूळ आणि बेकिंग पावडर एकत्र करा यात कोको पावडर , बेकिंग सोडा, तेल आणि दूध घाला हे सर्व जिन्नस एका भांड्यात व्यवस्थितपणे एकत्र करा. आता एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्या, चांगलं फेटून झाल्यावर त्यात चॉकलेटचे तुकडे घाला.

आता हे तयार झालेलं मिश्रण एका सिरॅमिक कप मध्ये भरा. पण त्यापूर्वी कप ला हलकासा बटर लावून ग्रीस करून घ्या. मिश्रण भरलेला कप मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १८० डिग्री वर ८ मिनिटं व्यवस्थित बेक होऊद्या. ८ मिनिटानंतर केक बेक होऊन तयार. त्यानंतर तो व्यवस्थित थंड करून घ्या तयार मिश्रण कपात भरून बेक करून घ्या. केक बेक झाल्यानंतर त्यावर लिक्विड चॉकलेट एड करा. त्यावर वरून लिक्विड चॉकलेट घाला, स्प्रिंकल्स आणि इतर वस्तुंनी सजावट करून घ्या. तयार आहे सॉफ्ट, स्पॉजी मग केक आणि घरात सर्वाना खाऊ घाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *