Breaking News

Tag Archives: prime minister

सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी यांची मागणी, अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा

केंद्र सरकारने लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे. या योजनेत केवळ ४ वर्षांची सेवा करण्याची संधी दिली जाते, वेतन केवळ २१ हजार आणि निवृत्तीनंतर कोणतेही लाभ दिले जात नाहीत. ‘अग्निवीर’ योजनेतून लष्करात चार वर्ष सेवा केल्यानंतर या सैनिकांना ऐन उमेदीच्या वयातच वाऱ्यावर सोडले जाते. अग्निवीर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला,… अभ्यासाचा नियमित सराव करा

कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी…

देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले. विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल,… मोदींचे राज्य की औरंगजेबाचे

मागील काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगवास भोगल्यानंतर आता ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आणि संजय राऊत यांच्या मुलीला ईडीने नोटीस पाठविली. या ईडी नोटीसीवरून संजय राऊत यांनी ईडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन …

Read More »

नरसय्या आ़डम पंतप्रधानांच्या उपस्थितीतच म्हणाले, १ लाख लोकांना रोजगार…

सोलापूरातील शहरातील विडी कामगारांना हक्काची घरे मिळावित या उद्देशाने मागील अनेक वर्षे लढा पुकारलेल्या, कम्युनिस्ट पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार निर्मितीसाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत मिलीटरी कापड निर्मितीची काम दिल्यास येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या केंद्र सरकारचा १० वा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला

लोकसभा निवडणूकीचे पडघम प्रत्यक्ष वाजण्यास काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. मागील ९ वर्षात देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे देशात सर्वाधिक तरूणाई असतानाही क्रयशक्ती पुरेशी निर्माण होताना दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जितक्या वेगाने देशाच्या विकासाची गती वाढायला हवी होती तितक्या वेगाने मंदावत …

Read More »

दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांनी “घोंचू” म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मालदिवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरील परराष्ट्र संबध तोडत भारताचा शत्रु असलेल्या चीनशी जवळीक साधली. तसेच आगामी काळात भारताचा हस्तक्षेप मालदिवकडून सहन केला जाणार नसल्याच्या मुद्यावर मालदिवसह चीनच्या अध्यक्षांकडून सहमती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःला सनातनी राष्ट्रीयत्वाचे स्थान मिळविण्याच्या नादात परराष्ट्र नीती आणि देशापेक्षा स्वतःला वरचे स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदी हे स्वतःचा चीनने …

Read More »