Breaking News

Tag Archives: prime minister

नव्याने लागू झालेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नेमकी काय आहे? राज्यात लागू-मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्‍याच्‍या सहभागाने राबविण्‍यात येणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …

Read More »

पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुम्हीही घरी आणू शकता किंमत १०० रुपयांपासून सुरू

अनेकदा तुम्ही पाहत आहात की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशात किंवा परदेशात जातात तेव्हा त्यांना अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून मिळतात. यामध्ये चित्रे आणि स्मृतिचिन्हांसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आता तुम्हाला पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुमच्या घरी आणण्याची संधी आहे. अशा ९१२ भेटवस्तूंचा लिलाव होत असून त्यांचा ई-लिलाव गांधी जयंती …

Read More »

हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन यांचे निधन देशाला अन्नधान्यात स्वावलंबी बनविणारे स्वामीनाथन यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतात १९७२ चा दुष्काळ पडल्यानंतर देशावर अमेरिकेहून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यावर गुजराण करण्याची परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यावेळी देशातील पारंपारीक पीक पध्दतीत अनुलाग्र बदल घडवित शेतकऱ्यांची शेती उत्पादन कसे वाढेल या दृष्टीने देशात सुरु केलेल्या पहिल्या हरित क्रांतीचे सरसेनापती डॉ एम एस स्वामीनाथन आणि मुख्य नॉर्मन बरलॉग यांच्या प्रयत्नातून देशात …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,… पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का? मोदी सरकारची धोरणे, योजना ह्या मित्रों व अदानीच ठरवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पंतप्रधान मोदींची टीका चुकीची पंतप्रधान मोदींचं वक्तव्य क्लेशदायक

२१ सप्टेंबरला महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले तर कोणीही विरोध केला नाही. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका चुकीची आहे. महिला आरक्षणावर आधी देखील विचार झालेला आहे. पंतप्रधानांनाचे ते वक्तव्य क्लेषदायक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …

Read More »

९ वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखविला हिरवा झेंडा, जाणून घ्या मार्ग ११ राज्यात धावणार वंदे भारत रेल्वेः खाद्य पदार्थही मिळणार

देशातील ११ राज्यांमधील ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविला. या ११ वंदे भारत ट्रेन ११ राज्यातील पर्यटन ठिकाणाला आणि प्रसिध्द धार्मिक ठिकाणी पोहोचणार आहेत. हिरवा झेंडा दाखविण्यात आलेल्या या वंदे भारत रेल्वेमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, विधेयकातील त्या तरतुदी तुम्ही नाही वगळल्या तर आम्ही वगळू जणगणना झाल्यानंतर आरक्षण कशाला देता ते तर आज आता ३३ टक्के लागू करा

नव्या संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला माझे समर्थन आहे. या विधेयकात सर्वात मोठी गोष्ट हरविली आहे. ती गोष्ट म्हणजे ओबीसी वर्गातील महिलांना यात स्थान देण्यात आले नाही. देशातील सर्वाधिक जनसंख्येने असलेल्या ओबीसी महिलांना यात स्थान नसणे हे ही एक आश्चर्य आहे. तसेच या विधेयकात मला आणखी एक …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुच्या हृदयात थेट चाकू महिला आरक्षण म्हणजे निव्वळ धूळपेक

गणेश चर्तुर्थीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नव्या इमारतीत एकप्रकारे गृहप्रवेश केला. मात्र हा प्रवेश करताना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या कोणत्याही प्रकार कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत याची काळजी घेतली. त्याचबरोबर विशेष अधिवेशनाचे कामकाजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार आज या नव्या इमारतीत सुरु झाले. तसेच नव्या …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, महिला आरक्षण विधेयक २०१० मध्ये मंजूर पण… अनुसूचीत जाती-जमातींना आरक्षण देण्याची त्यावेळी गरज होती

मागील १० वर्षापासून देशात महिला आरक्षणाच्या मुद्यावरून देशात सातत्याने विविध राजकिय पक्षांकडून कधी राजकिय तर कधी सामाजिक स्तरावर चर्चा घडवून आणण्यात येत आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेतही कधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर कधी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मांडल. पण या दोन्ही पंतप्रधानांना संख्याबळामुळे दोन्ही सभागृहात मंजर …

Read More »