Breaking News

९ वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखविला हिरवा झेंडा, जाणून घ्या मार्ग ११ राज्यात धावणार वंदे भारत रेल्वेः खाद्य पदार्थही मिळणार

देशातील ११ राज्यांमधील ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविला. या ११ वंदे भारत ट्रेन ११ राज्यातील पर्यटन ठिकाणाला आणि प्रसिध्द धार्मिक ठिकाणी पोहोचणार आहेत.

हिरवा झेंडा दाखविण्यात आलेल्या या वंदे भारत रेल्वेमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या गाड्यांमध्ये सुरक्षा यंत्रणाही बसविण्यात आली असून रेल्वेचा अपघात होऊ नये म्हणून कवच तंत्रज्ञानही बसविण्यात आले आहे.

९ वंदे भारत गाड्या या मार्गावर धावणार

१) उदयपुर ते जयपूर- मंगळवार वगळता ही गाडी दररोज धावणार आहे. तसेच या गाडीला राणाप्रतापनगर, भिलवारा, अजमेर, किशनगृह असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

२) हैद्राबाद ते बंगरूळू – बुधवार वगळता आठवड्याचे सहा ही दिवस ही ट्रेन धावणार आहे. यशवंतनगर, कर्नुल, काचेगुडा, मेहबूबनगर, कर्नुल, धर्मवरम मार्गे जाणार आहे.

३) जामनगर ते अहमदाबाद- या मार्गावरील वंदे भारत ट्रेन सातही दिवस धावणार आहे. राजकोट, सुरेंद्रनगर, विक्रमग्राम, सानंद, साबरमती अशी धावणार आहे.

४) विजयवाडा ते चेन्नई- या मार्गावरील वंदे भारत ट्रेन दररोज धावणार असून या मार्गावरील फक्त तेनाली, ओंगले, नेल्लूर, रेनिनगुटा आदी थांबे देण्यात आले आहेत.

५) पटना ते हावडा- या मार्गावरीलही गाडी दररोज धावणार आहे. या मार्गावर पटनासाहिब, लुकीसराई, जासीदीय, जमतारा, दुर्गापूर आदी काही निवडक थांबे देण्यात आले आहेत.

६) कासारगुड ते तिरूवंतपूरम- या मार्गावरही वंदे भारत ट्रेन दररोज रेल्वे धावणार असून जारसू गुडा, कन्नुर, कोझिकोडे, शोरनार, त्रिसुर, एर्नाकुलम कोट्टायम, कोलाम आदी निवडक स्थानकांचे थांबे देण्यात आले आहेत.

७) राऊरकेला ते भुवनेश्वर-पुरी- या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे
संभलपूर, धेनकनल, कटक,भुवनेश्वर खुर्दा रोड आदी ठिकाणी या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.

८ ) रांजी ते हावडा,- या मार्गावर मंगळवार वगळता दररोज वंदे भारत ट्रेन धावणार आहे. या गाडीला मुरी, कोटशीला, पुरुलिया, चांदील, टाटानगर, खर्गपूर आदी थांबे देण्यात आले आहेत.

९) तिरूनेवली-मदुराई-चेन्नईः- या मार्गावरही वंदे भारत धावणार आहे. वृरूंनदुनगर, मदुराई, दिंदीगुल, तिरूचापरली, विल्लूपूरम, तंबारम आदी ठिकाणे थांबे देण्यात आले आहेत.

Check Also

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक आमदारकीची निवडणूक १० जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *