Breaking News

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ हे टीकेचे धनी ठरत आहेत.

हिटलरच्या ज्यु विरोधी लढ्यात सहभागी राहिलेले यारोस्लॅव हुनका हे हिटलरच्या १४ व्या ग्रेनेडियर डिव्हीजन आणि हिटलरच्या नाझी संघटनेचे भाग होते. त्यांचे जेव्हा कॅनडाच्या संसदेत आगमन झाले तेव्हा तेथील हॉऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांनी उभे राहुन टाळ्या वाजवित स्वागत करत सत्कार केल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्लादीमीर झेलेन्सकी यांनी केला.

हाऊस ऑफ कॉमन्सचे स्पीकर अन्थोनी रोटा यांनी नंतर हिटलरच्या नाझीसोबत राहिलेल्या व्यक्तीला पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी एकट्याने हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निमंत्रित केले नव्हते असे सांगत त्याबद्दल माफी मागितली. परंतु कॅनडाच्या विरोधी पक्षनेत्याने आरोप केला की, जस्टीन ट्रुड्युऊ हे हुनका यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात भेटले.

त्यावर जस्टीन ट्रुड्युओ यांना याप्रकरणी पुर्ण दोषी ठरविता येणार नाही तसेच त्यांच्या राजशिष्टाचार विभागाची चुक असू शकेल असे सांगत त्यांचा राजशिष्टाचार विभागच व्यक्तींची बैठक घडवून आणत असतो. इतकी मोठी गोष्टी हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांना माहित नसताना कडूच कशी शकते असा आरोप विरोधी पक्षाचे नेते पिरे पैलेवरे यांनी ट्विट करत वैयक्तीक माफी मागा आणि नेहमीच इतरांवर जसे दोषरोप ठेवता ते बंद करा असे सांगितले.

दरम्यान, जगमित सिंग या संसद सदस्याने ट्विट करत आम्ही सगळे उभे राहिलो ते एका विरोधी भावनेतून पण आता असे पुन्हा होणार नाही असे सांगत एक स्टेटमेंट ट्विटच्या माध्यमातून जारी केले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *