Breaking News
जवान

‘जवान’ चित्रपटाने कमाईचा रचला नवा विक्रम रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या महिन्याच्या ७ तारखेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यापूर्वीच नवे रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाने १८ दिवसांत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे.

सकनिल्‍कच्‍या माहितीनुसार, रिलीजच्‍या १८ व्‍या दिवशी चित्रपटाने १५.६९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईच्या आधारे या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ५६२ कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट लवकरच भारतात ६०० कोटींचा आकडा पार करू शकतो. ‘जवान’ हा सर्वात जलद ५०० कोटींचा टप्पा पार करणारा चित्रपट ठरला आहे.

अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटाने परदेशातही चांगली कमाई केली आहे. किंग खानच्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात एक हजार कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगूमध्येही मोठी कमाई केली आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘पठाण’ आणि ‘गदर-२’लाही मागे टाकले आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाला जगभरात 1000 कोटींची कमाई करण्यासाठी २६ दिवस लागले, मात्र जवानने अवघ्या 18 दिवसांत जगभरात १००० कोटींचा व्यवसाय केला आहे.

त्याचबरोबर ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याचे पाच लूक पाहायला मिळणार आहेत. याशिवाय या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, रिद्धी डोगरा यांच्याही भूमिका आहेत.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *