Breaking News

हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन यांचे निधन देशाला अन्नधान्यात स्वावलंबी बनविणारे स्वामीनाथन यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतात १९७२ चा दुष्काळ पडल्यानंतर देशावर अमेरिकेहून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यावर गुजराण करण्याची परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यावेळी देशातील पारंपारीक पीक पध्दतीत अनुलाग्र बदल घडवित शेतकऱ्यांची शेती उत्पादन कसे वाढेल या दृष्टीने देशात सुरु केलेल्या पहिल्या हरित क्रांतीचे सरसेनापती डॉ एम एस स्वामीनाथन आणि मुख्य नॉर्मन बरलॉग यांच्या प्रयत्नातून देशात पहिली हरित क्रांती घडवून आणण्यात आली यशस्वी ठरलेल्या डॉ एम.एस.स्वामीनाथन यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

देशातील शेती पीकाचे उत्पादन दुप्पट कसे होईल असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. त्यावेळी डॉ एम एस स्वामीनाथम यांनी हरित क्रांतीची गरज त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर मांडली. त्यामुळे शेती पीक उत्पादनात कमालीचा बदल झाला. त्यानंतर देशाला अन्न धान्याच्या बाबत स्वावलंबी बनण्यात मदत झाली. त्यामुळेच अन्न धान्याच्या अनेक पीकांमध्ये दुपटीने वाढ झाली.

डॉ एम एस स्वामीनाथन हे भारतीय किसान संशोधन केंद्राच्या संचालक पदावर १९६१-७२ या कालाधीत काम केले. त्यानंतर डायरेक्टर जनरल आयसीएआर म्हणून त्यांनी काम केले. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या प्राचार्य पदी, कृषी विभागाचे प्रधान सचिव, सायन्स आणि कृषी विभागाचे प्रभारी चेअरमन तथा सदस्य म्हणून, नियोजन विभागाचे संचालक, फिलीपाईन्स येथील आंतरराष्ट्रीय भात (राईस) संशोधन इन्टीट्युटचे संचालक म्हणूनही डॉ एस.एस. स्वामीनाथन यांनी काम पाहिले आहे.

२००४ मध्ये देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि पीक पध्दतीच्या अनुंगाने एम.एस.स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २००६ साली शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आत्महत्या रोखण्याच्यादृष्टीने शिफारसींचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला.

डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून आदरांजली वाहीली असून नरेंद्र मोदी म्हणाले, देशाच्या अत्यंत कठीण काळात देशाच्या कृषी खात्यात केलेल्या कामामुळे आज कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडल्याचे दिसून येत आहे. डॉ एम.एस. स्वामीनाथन हे नवनव्या संकल्पनांचे शिल्पकार होते. त्यांच्याकडे संकल्पनांचे भांडार होते. त्यांनी केलेले काम अनेकांना सतत प्रेरणादायी ठरणार आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *