Breaking News
Dream 11

५५ हजार कोटी रुपये जमा करा; Dream 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘ड्रीम ११’ ( Dream 11 ) सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांवर वस्तू आणि सेवा कर मध्ये सुमारे ५५,००० कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप केला आहे. GST विभागाने फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ( Dream 11 वर एकूण ४० हजार कोटींच्या करचोरीचा आरोप असल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी फॉर्म DRC-01A द्वारे मूल्यांकन केलेल्या कर दायित्वांची अधिसूचना देखील जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष जैन यांच्या नेतृत्वाखालील ड्रीम ११ यांनी त्यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवाय, येत्या आठवड्यात तत्सम स्वरूपाच्या अतिरिक्त नोटिसा जीएसटी विभागाकडून जारी केल्या जातील असा अंदाज आहे. ‘मनी कंट्रोल डॉट कॉम’च्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी अॅस्११ ने ३,८४० कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑपरेटिंग कमाईतून १४२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची शेवटची बैठक २ ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत कॅसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगवरील कर आकारणीत स्पष्टता देण्यासाठी जीएसटी कायद्यातील सुधारणांना मंजुरी देण्यात आली.

मागील बैठकीत, कॅसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगवरील बेट्सच्या एकूण दर्शनी मूल्यावर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *