Breaking News

प्रकाश आंबेडकर यांनी “घोंचू” म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मालदिवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरील परराष्ट्र संबध तोडत भारताचा शत्रु असलेल्या चीनशी जवळीक साधली. तसेच आगामी काळात भारताचा हस्तक्षेप मालदिवकडून सहन केला जाणार नसल्याच्या मुद्यावर मालदिवसह चीनच्या अध्यक्षांकडून सहमती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःला सनातनी राष्ट्रीयत्वाचे स्थान मिळविण्याच्या नादात परराष्ट्र नीती आणि देशापेक्षा स्वतःला वरचे स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदी हे स्वतःचा चीनने रचलेल्या सापळ्यात फसले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख घोंचू मोदी असे करत नरेंद्र मोदी यांच्यावर एक्स या समाजमाध्यावर ट्विट करत निशाणा साधला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर “कृती” आणि “प्रतिक्रिया” चे भयंकर परिणाम याच्या सापळ्यातून मुक्त न होता, मोदींनी मालदीव विरुद्ध बहिष्कार मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. आपल्या शेजारी चीनने रचलेल्या सापळ्यात “घोंचू”ने संपूर्ण देशाला नेले असल्याची टीकाही केली.

नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नीतीवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, बहिष्कार आणि द्वेष मोहिमेमुळे सध्याच्या मालदीव सरकारला चीनच्या दिशेने आणखी एक इंच वाढण्याची कारणे मिळाली आहेत. घोंचू मित्र म्हणून मोदींना महागात पडले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदी महासागर आणि दक्षिण आशियातील वर्चस्व वाढीलाही मदत झाल्याचा आरोप केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर चीन आता मालदीवच्या बेटाचा वापर करून हिंदी महासागरात स्वतःचे “डिएगो गार्सिया” बांधणार आहे असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *