Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन करत १२ वाजून ८४ सेंकदाला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापणा करण्यात आली.

राम मुर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या या सोहळ्यास राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी उपस्थित होत्या. तसेच राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोविंद गिरी महाराज हे ही उपस्थित होते. मुर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते द्रव्य प्राशन करत नरेंद्र मोदी यांनी आपला ११ दिवसांचा उपवास सोडला.

रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना विधीवत पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राम लल्लाच्या मुर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर हिंदू धर्मातील काही पंथाच्या मंहत आणि साधूंचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरात जमा झालेल्या साधूसंतासमोर आणि उपस्थित हिंदू भाविकांबरोबर आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील अनेक वर्षापासून राम तंबूत रहात होते. आता ते तंबूत राहणार नाहीत. तर या भव्य मंदिरात ते राहतील असे सांगत राम ही भारताचे मुळ आहे. आज आपण पूर्णतः गुलामी मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या मुळ प्रवाहात सहभागी होत असल्याचे स्पष्ट करत राम लल्ला हे फक्त कोण्याएकट्याचे नाही तर ते सगळ्यांचे आहेत. त्याच्यामुळे यापुढे प्रेरणा मिळत राहिल असेही सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पण रामाची आज माफी मागणार आहे. मधल्या काही वर्षात राम मंदिर उभारू शकलो नाही. परंतु आता रामासाठी मंदिर उभारू शकलो. त्यामुळे ते ही माफ करतील. राम हे आग नाही तर ऊर्जेचा स्त्रोत आहे असेही यावेळी नमूद केले.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप…भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *