Breaking News

आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला

एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव यांच्या दर्शनासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना मात्र मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याने दोन तास मंदिर प्रवेशासाठी धरणे आंदोलन करावे लागल्याचे नवे चित्र आज पाह्यला मिळाले.

आगामी लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यातच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आर्थिक निकषावर आणि विकासात्मक स्थरावर अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जनतेचे मुख्य प्रश्नांवरून लक्ष्य हटविण्यासाठीच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन आणि राम मुर्तीची प्रतिष्ठापणा जाणिवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज आसाम मेघालयच्या सीमेपासून काही शेकडो किमीच्या अंतरावर भल्या सकाळी श्री श्री शंकरदेव यांच्या जन्मगावी पोहोचली. तेथील श्री श्री शंकरदेवांच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी राहुल गांधी हे निघाले असता त्यांना तेथी पोलिस पोलिस प्रशासनाने सांगितले की, राहुल गांधी वगळता कोणीही त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतो. पण राहुल गांधी यांना नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यावर सोबत असलेले स्थानिक आमदार शिबोमणी बरूआ आणि खासदार गौरव गोगई आणि जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांना परवानगी का नाही असा सवाल विचारला. त्यावर पोलिस प्रशासनाने प्रत्तुत्तर दिले की, जर राहुल गांधी यांना शंकरदेव यांच्या मंदिरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत स्थानिक प्रशासनाने राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखले.

तसेच राहुल गांधी यांच्यासह असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राहुल गांधी यांच्यासह आसाम मधील अनेक स्थानिक नागरिकांनी सकाळपासूनच मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी वाट पहात होते. मात्र राहुल गांधी यांना प्रवेश नाकारण्यावर स्थानिक प्रशासन ठाम राहिल्याने राहुल गांधी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्ये मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केले.

अखेर स्थानिक खासदार आणि आमदारांच्या शिष्टमंडळाला स्थानिक प्रशासनाने मंदिरात प्रवेश दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भाजपाची कमाई तोबा वाढली, वर्षात १३०० कोटी रूपये

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १० वर्षाच्या काळात भलेही महागाई, बेरोजगारी आणि देशातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *