Breaking News

भाजपा कार्यकर्त्ये आले राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पण, घेऊन गेले फ्लाईंग किस

१४ जानेवारी रोजी मणिपूरहून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा १८ जानेवारी रोजी आसाम राज्यात प्रवेशली. त्यानंतर आज पुढे मार्गक्रमण करताना सुनितपूर येथून पुढे जाताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला रोखण्यासाठी भाजपाचे काही कार्यकर्त्ये हाती भाजपाचे झेंडे आणि राम मंदिराची निशाणी असलेले झेंडे घेत राहुल गांधी ज्या बस ने प्रवास करत होते त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या कार्यकर्त्याच्या या पावित्र्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्येही भाजपा कार्यकर्त्यांना भिडले.

राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रा का थांबविली जातेय हे पाहण्यासाठी बस थांबविण्यास सांगत स्वतः बसमधून खाली उतरवले. परंतु राहुल गांधी यांना असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना परत बसमध्ये चढण्याची विनंती करत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पाहताच मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना कोणतेही प्रत्युत्तर न देता फक्त फ्लाईंग किस देण्यास सुरुवात केली.

तत्पूर्वी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीला भाजपा कार्यकर्त्यांनी घेरत, त्यांच्या गाडीला लावण्यात आलेले भारत जोडो न्याय यात्रेचे पोस्टर्स फाडले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु जयराम रमेश आणि त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रत्युत्तर न देता शांत रहात भाजपा कार्यकर्त्यांची गुंडागर्दी बघत गाडीतच शांत बसले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राहुल नार्वेकरांचे निकाल वाचनः दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार पात्र, पण पक्ष अजित पवारांचा

डिसेंबर २०२३ च्या अखेरीस शिवसेना पक्षातील फुटीच्या दाव्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *