Breaking News

Tag Archives: ncp

अजित पवार यांनी सांगितले की, त्यांच्या बंडाला आणि सरकारला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. १९ जून २०२२ रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यानंतर, राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा …

Read More »

छगन भुजबळ यांनी भूमिका, ..मनिषा कायंदे शिंदे गटात कशा गेल्या…

शिवसेनेचा आज ( १९ जून ) ५७ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरे करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, शिवसेना अभेद्य राहावी, अशी इच्छाही भुजबळ यांनी …

Read More »

मनिषा कायंदेचे जाणे राष्ट्रवादीच्या पथ्यावर? अजित पवार म्हणाले, आता आम्ही निश्चित विचार करू

भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेल्या मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर पक्ष प्रवक्त्ये पदाची जबाबदारी सोपवित विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले. शिवसेनेतील फुटीनंतरही कायंदे या उध्दव ठाकरे यांच्या गटात राहिल्या. मात्र आता पुढील राजकिय गणितातील फायदे तोटे बघत नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

अजित पवार यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना…

शिवसेनेचा १९ जूनला वर्धापन दिन आहे. त्यापार्श्वभूमीवर वरळीत शिवसेनेचं ( ठाकरे गट ) राज्यस्तरीय शिबिर पार पडलं. या शिबिराला हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावर विरोधी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा युक्तीवाद,… अजित पवार यांच्यावरील गुन्हे ही कमी झाले

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. तसेच मोहित कंबोज यांनी कर्ज फेडले नसल्याविषयीच्या काही जाहिराती बँक ऑफ बडौदा आणि अन्य काही राष्ट्रीयकृत बँकांनी प्रसारमाध्यमात दिल्या होत्या. या कथित बँक घोटाळाप्रकरणात सीबीआयनेच कंबोज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट नुकताच न्यायालयात सादर करत क्लीनचीट दिली. …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,… पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करतेय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. …

Read More »

अजित पवार यांची मिश्किल टीपण्णी, कसं चालायचं? कस मुख्यमंत्री व्हायचं

शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी ‘अजित पवारांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो,’ असं विधान केलं आहे. यावर अजित पवार यांनी मिश्कील …

Read More »

शिंदे-फडणवीसांमध्ये दिलजमाई? वर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मला काहीही वाटत नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून …

Read More »

लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक; गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह… अजित पवार यांनी संताप व्यक्त करत साधला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. …

Read More »