Breaking News

शिंदे-फडणवीसांमध्ये दिलजमाई? वर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मला काहीही वाटत नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात दोघांना मिळून महाराष्ट्राच्या जनतेचा एकत्रित कौल असल्याचा दावा करण्यात आला. यावरून नव्याने चर्चा सुरू झाली. त्यामुळेच आज पालघरमधल्या कार्यक्रमात हे दोघे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात दोघांनी एकत्र व्यासपीठावर हजेरी लावली, सुरुवातीला या दोघांमध्ये चांगलेच बिनसलंय असे दिसत असताना भाषणात आपल्यात काहीही बिनसलं नसल्याचाच दावा दोघांनी केला. यावरून नव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अमेय खोपकरांनी केलेल्या खोचक टीकेलाही अजित पवारांनी महत्त्व देत नसल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात दोघांना मिळून महाराष्ट्राच्या जनतेचा एकत्रित कौल असल्याचा दावा करण्यात आला. यावरून नव्याने चर्चा सुरू झाली. त्यामुळेच आज पालघरमधल्या कार्यक्रमात हे दोघे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

यावेळी अजित पवार म्हणाले, मला काहीही वाटत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माहितीये की एकमेकांसोबत राहिल्याशिवाय दोघांची पदं राहणार नाहीत. १५५ आमदार जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहेत, तोपर्यंत त्यांचं सरकार चालणार आहे. त्यामुळे ते कशाला एकमेकांमध्ये अंतर पाडून कशाला घालवतील? या सगळ्या चर्चा मीडियामध्येच आहेत, असं सांगितले.

चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात, असं म्हणत अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला होता. त्यावरही अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

ज्यांना थोडंही डोकं चालवायचं नाही, असे लोक काहीही बोलतात. शरद पवारांनी आधीच सांगितलंय की मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. इतके कमी खासदार घेऊन कुणीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आहे. पण कुणीही काहीही बोलायला लागलं तर त्यांच्या बोलण्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. कोण मुद्दा उपस्थित करतंय, त्यालाही महत्त्व आहे. त्यांना स्वत:ला पुरंदर मतदारसंघात नाकारलंय. ते नेहमीच असं काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्राची परंपरा आहे की वडिलधाऱ्या व्यक्तीचा आदर करणं. पण या लोकांवर संस्कारच असे झाले असतील, तर काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *