Breaking News

अजित पवार यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना…

शिवसेनेचा १९ जूनला वर्धापन दिन आहे. त्यापार्श्वभूमीवर वरळीत शिवसेनेचं ( ठाकरे गट ) राज्यस्तरीय शिबिर पार पडलं. या शिबिराला हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पहावे तिकडे, भावी मुख्यमंत्री. पण, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. हे राजकारण आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर आम्ही १४५ आमदार निवडून आणू. मुंबई महापालिका आम्ही जिंकू, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या घडली तिघे एकत्र आल्याशिवाय भाजपा आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टीकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टीकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय, असं अजित पवारांनी सांगितलं.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांची भीती, भाजपाचेच सरकार पुन्हा आल्यास सर्वसामान्यांचा मतदानाचा…

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण त्यालाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *