२३ जूनला आम्ही पाटण्याला जाणार आहोत. नितीशकुमार मातोश्रीवर आले होते. भाजपासोडून सगळे मातोश्रीवर येतात. विरोधी पक्षांची एकजूट नाही तर स्वातंत्र्यप्रेमींची, देशप्रेमींची एकजूट आहे. जे देशावर प्रेम करतात त्यांनी आमच्या सोबत यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी करत काल परवा अमित शाह आले होते आम्हाला प्रश्न विचारत होते. पण आम्ही विचारले की तुमचं सगळे झाकून ठेवता अशी टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले. सावरकरांनी हाल अपेष्ठा भोगल्या होत्या त्या मोदी आणि फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या. भाजपासोडून दुसरे पक्ष एकत्र येतोय ते लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येतोय. आज भाजपापासून वेगळे झाल्यानंतरही देशभरातील इतर पक्षांचे नेते मातोश्रीवर येत आहेत. यावरून शिवसेनेचे महत्व त्यांना कळलं आहे. मात्र भाजपाला अद्याप समजलं नसल्याचं दिसतंय अशी टीकाही केली.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही, तरीही सोबत आहात. तुमची साथ सोबत महत्त्वाची आहे. उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन परवा जागतिक गद्दारी दिन असेल. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला वर्ष होईल. गेल्या वर्षात जे लोक भेटत आहेत, मराठी आहेत अमराठी आहेत. हिंदू भेटत आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लीम लोकं भेटत आहेत. ते लोकं भेटतात आणि काळजी करु नका, असं सांगतात. जे निघाले आहेत त्यांना जाऊ द्यात. सुखमे साथ रहतै है उन्हे रिश्ते कहते है, जे दुखमें साथ रहते है उन्हे फरिश्ते कहते है.
यावेळी अमित शाह यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, अदानीवरुन प्रश्न विचारला की तुमची बोबडी वळते, तुम्हाला प्रश्न विचारला की राहुल गांधींना घराबाहेर काढता, संसदेतून बाहेर काढता, तसेच प्रश्न विचारणाऱ्यांना तुरुंगात डांबता अशी खोचक टीका करत ३७० कलम काढताना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला हे अमित शाहांनी बातम्या काढून बघाव्यात. ३७० कलम काढून इतकी वर्ष झाली जम्मू काश्मीरमध्ये अजून निवडणुका का घेत नाहीत, असा सवालही केला.