Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

केवळ पुरवठा रखडू नये म्हणून खाजगी कंत्राटदाराकडून औषधांची खरेदी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचा माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय रूग्णालये आणि आरोग्य केंद्रासह इतर विभागांना औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्य विभागाकडून अजूनही खाजगी औषध विक्रीकरणाऱ्या कंत्राटदारांकडूनच खरेदी करण्यात येत आहे. मात्र हाफकीन मार्फत औषधांची खरेदी हळूहळू सुरु करण्यात येत असल्याने त्यास वेळ लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली. …

Read More »

अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाईसारखी ना गड्या सारखी अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी मांडली खंत

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सर्व अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पित पुरवणी मागण्या असतील आणि इतर विषय असतील. त्यावर बोलायला अध्यक्ष महोदय तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना वेळ वाटून देता. मात्र आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाई ना धड गड्याची राहीली अशी खंत व्यक्त करत सभागृहात बोलण्यासाठी आम्हालाही वेळ द्या अशी …

Read More »

औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्थेचा ‘कचरा’ केल्याने आयुक्त यादव घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले सक्तीच्या रजेवर: काँग्रेससह सर्व पक्षांनी कामकाज रोखून धरले

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद येथील कचरा डेपोच्या प्रश्नी नागरीकांनी विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच आंदोलनकर्त्या नागरीकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेचे कामकाज रोखून धरत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अखेर …

Read More »

राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर …

Read More »

भिसे आणि बोंद्रे यांचा मंत्री लोणीकर आणि मंत्री तावडेंच्या उत्तरावर संताप ४५ दिवस आधी प्रश्न देवूनही उत्तरे चुकीचे देत असल्याचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्री महोदय ज्या गावात योजना सुरु असल्याचे सांगत आहेत. त्या गावातील नदीच्यावरील विहीरीत पाणीच नाही. पाणी नसताना तेथे पाणी पुरवठ्याची योजना कशी सुरु असेल असा सवाल आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी उपस्थित केली. तसेच मंत्री महोदय चुकीचे उत्तर देत असून चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. …

Read More »

बिटकॉईन स्किम फसवणूक प्रकरणाची चौकशी ईडीकडे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेन बिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉन्झी स्कीम सूरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोटयावधीची गुंतवणूक करताच  ही स्किम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास …

Read More »

अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी ना न्याय दिल्याचा आरोप करत आरोग्य खात्याला निधीची कमतरता भासत आहे. सोय सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असून फक्त आश्वासनांचे …

Read More »

मुंबईतील बेकायदेशीर इमारतींवर तीन महिन्यात कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहरात ज्या इमारतींचे मनपाच्या कागदोपत्री अस्तित्वच नाही अशा बेकायदेशीर इमारतींची तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत आज केली. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनधिकृत इमारतींची यादी जयंत पाटील यांनी …

Read More »

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडे, एकबोटेंची नावे न घेता मुख्यमंत्र्यांचे उत्तर मात्र दलितांवरील बंदच्या काळातील खटले मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या ९३ अन्वये भीमा कोरेगांव येथील दंगलप्रकरणी प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेस उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दंगलीस कारणीभूत असलेल्या आणि अँट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळत या दोन्ही आरोपींना …

Read More »

कोल्हापूरपेक्षाही लहान त्रिपुरा जिंकले म्हणून हुरळून जाऊ नका, महाराष्ट्राच्या मातीत या मग दाखवतो जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान

मुंबई : प्रतिनिधी ईशान्य भारतातील निवडणूकीत त्रिपुरा राज्यात विजय मिळविल्याचा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र त्रिपुरा राज्य आहे तरी केवढे असा उपरोधिक सवाल करत आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मतदारसंघात विजय मिळविल्याने फार हुरळून जावू नका असा उपरोधिक टोला लगावत महाराष्ट्राच्या …

Read More »