Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापणार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सल्लागार समिती गठीत करण्याचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ कोटी ६५ हजार असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. या मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही सल्लागार समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभू, सुनिल राऊत, अशोक पाटील, …

Read More »

आता पालकांनाही फी वाढीच्या विरोधात तक्रार करता येणार येत्या शैक्षणिक वर्षापासून शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी खासगी शाळांनी अवैधपणे फी वाढवली तर येत्या शैक्षणिक वर्षापासून फी वाढीच्या विरोधात पालकांना तक्रार करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेवून खासगी शाळांवर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत मुंबईतील …

Read More »

रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा विधानसभेत विखे-पाटील तर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी रेल्वेमधील अॅप्रेंटिसच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत करत रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागत असल्याची टीका केली. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकारचे अपयश असल्याची टीका करीत या विषयावर सरकारने …

Read More »

पुर्नवसित इमारतींतील रहिवाशांच्या माहितीचे डिजिटायझेशन करणार घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नाले, रस्ते व अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधित होणार्‍या झोपडीधारकांसाठी चेंबुरच्या माहुल परिसरात उभारण्यात आलेल्या ४६ इमारतींमधील २०० घरांची विक्री झाल्याचा  प्रश्न शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी  कारवाईची मागणी केली असता. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना घडू नयेत …

Read More »

आता अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे सेविकांना १ हजार ५०० रुपये मानधन वाढ देण्याची महिला व बाल कल्याण मंत्री मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनि अंगणवाडी सेविका यांच्या निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्यात येणार असल्याची माहिती तसेच १ हजार ५०० रुपयांची मानधनवाढ आणि सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री मुंडे …

Read More »

दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार एक महिन्यात निर्णय घेणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री बडोलेचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना  ९०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत दिले. यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, …

Read More »

विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्याकडून माहीती उघडकीस

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली. विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, …

Read More »

लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा …

Read More »

गुढी पाडव्यापासून प्लास्टीक, थर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर रविवारी गुढी पाडव्याच्या दिवसापासून बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. तसेच प्लास्टीक आणि थर्माकॉल पासून ताट, कँप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बँग्ज, स्प्रेड शीट्स, प्लास्टीक पाऊच, पँकेजींग यासह …

Read More »

काँग्रेस अधिवेशनासाठी आमदार दिल्लीत काही निवडक आमदारांची सकाळी विधानसभेत हजेरी

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून तीन दिवस चालणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाला दांडी मारत काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेतील ८० टक्के आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाके रिकामे-रिकामे झाल्याचे पाह्यला मिळत होते. काँग्रेसचे …

Read More »