Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

भाजप सरकारच्या ३० हजार तासात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सत्तेत येवून ३० हजार तास झाल्याचा उल्लेख केला. आमच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कधीच असे तास, सेंकद, मिनिटे मोजले नाहीत. मात्र अर्थमंत्र्यांनी मोजल्याने त्यांचे काही खरे दिसत नसल्याची उपरोधिक टीका करत तुमचे सरकार आल्यापासून राज्यातील १६ हजार …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन

मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य …

Read More »

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट  म्हणाले की, याबाबत …

Read More »

आत्महत्योंका का ज्वार लाये है… अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा : विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी “परिवर्तन का ज्वार लाये है… सबका साथ सबका विकास किये महाराष्ट्र को …

Read More »

राज्याच्या तिजोरीत १५ हजार कोटींची तूट ३ लाख १ हजार कोटींचा खर्चाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाचा आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखविणाऱ्या अर्थसंकल्पाचे वाचन करत ३ लाख १ हजार ३४२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज राज्याच्या विधिमंडळात सादर करण्यात आला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर तर विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी राज्याच्या तिजोरीत १५ हजार ३७४.९० कोटी रूपयांची …

Read More »

नाणार प्रकल्प कोकणात नको, तर विदर्भात आणा भाजप आमदार आशिष देशमुख यांची मुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि उध्दव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नियोजित नाणार येथील रिफायनरी प्रकल्प सुरु करण्यास स्थानिक नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे वृत्त सातत्याने प्रसारमाध्मात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोकणऐवजी विदर्भातील कटोल येथे स्थलांतरीत करावी अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

राज्यावर ४२ हजार कोटींनी कर्ज वाढले तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ३६ हजार रुपयांचे कर्ज

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी राज्यावर तीन लाख ७१ हजार ४७ कोटींचे कर्ज होते. यावर्षी या कर्जात ४१ हजार ४७ कोटींची वाढ झाली आहे. एकूण कर्जाचा आकडा हा अर्थसंकल्पाच्या आधीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर ३६ हजार रूपयांचे कर्ज असल्याचे राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात नोंदविण्यात आले …

Read More »

जगापेक्षा महाराष्ट्राचा विकास दर जास्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जगातील १९३ देशांचा सध्याचा विकास दर हा ३ टक्के आहे. तसेच देशाचाही विकास दर कमी आहे. मात्र महाराष्ट्राचा यंदाचा विकास दर ७.३ टक्के इतका असून हा दर सध्याच्या काळात सर्वाधिक असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण …

Read More »

पतसंस्थांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी पतसंस्थांनी नागरीकांकडून ठेवी स्विकारल्या. मात्र त्यातील अनेक पतसंस्था या आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत किंवा त्या दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने अशा बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या पतसंस्थाची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री …

Read More »

वेळ पडल्यास मंत्रीपद सोडेन.. नाणारप्रकरणी उद्योगमंत्र्यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी वेळ पडली तर मंत्रीपद सोडेन. पण, नाणार प्रकल्पाच्या विषयावर आपण कोकणातील माणसाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले. हुस्नबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …

Read More »