Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

बदनामी झाल्याने एकनाथ खडसे यांची पुन्हा सरकारवर आगपाखड तर आमदारांवर आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी २५ ते ३० वर्षाच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्त मार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप …

Read More »

नियम बाह्य पध्दतीने कामकाज होतय? तपासून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्या आरोपावर अध्यक्ष बागडे यांचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी एक मार्च रोजी तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली नव्हती. मात्र त्यावेळची प्रश्नोत्तरे आज सभागृहाच्या पटलावर ठेवलीत. मग काल सोमवारी उद्योगमंत्र्यांनी एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नामधील न झालेल्या प्रश्नाबद्दल खुलासा करणे कितपत योग्य असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना करत सभागृहाचे …

Read More »

नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करणे अवघड मात्र निर्णय मुख्यमंत्री घेणार उद्योग मंत्री सुभाष देसाईंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्यात येत असल्याने १७ गावांपैकी १४ गावांच्या ग्रामपंचायतींनी जमिन भूसंपादनाच्या प्रक्रियेत विरोध दर्शविला असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करणे अवघड आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याची …

Read More »

आमदार परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून कामकाज तहकूब शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृहात घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोनवेळा बंद पाडले. तर शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे गटनेते तथा …

Read More »

अखेर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागणार लार्सन टुब्रोकडे कामाचे कंत्राट दिल्याची महसूल मंत्री पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अखेर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहण्याच्या कामास लवकरच गती मिळणार असून स्मारक उभारणीच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कंत्राटदाराच्या नेमणूकीची  प्रक्रिया पार पडली. या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आले असून तीन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

धनंजय मुंडेच्या आरोपा आधीच पंकजा मुंडेची पोलिसांकडे तक्रार पंकजा मुंडे यांच्या पीएने ५० लाखांची लाच मागितल्याची धनंजयचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक्काने (पीए) एका कामासाठी तब्बल ५० लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केला. पंकजा मुंडे यांनीही याच सत्रात या कट कारस्थानाची चौकशी करण्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती देत या आरोपातील हवा …

Read More »

दुषित भाज्यांची विक्री रोखण्यासाठी शेतकरी केंद्रे सुरू महापालिकेला केंद्रे सुरु करण्याबाबत सूचना करण्याचे नगरविकास राज्यमंत्र्याचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांद्वारे दुषित भाज्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी सांताक्रुज येथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेनुसार शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सुचना मुंबई महापालिकेला केली जाणार असल्याचे आश्वासनही नगरविकास राज्यमंत्री …

Read More »

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वाटोळे करायचे का ? २५ टक्के कोट्यातून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचा शिवसेनेसह विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी खाजगी शाळांमध्ये गरबी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी केंद्र  सरकारने २५ टक्के आरटीई अंतर्गत आरक्षित कोटा दिला. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधकांनी करत विधानसभेत संताप व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसेल तर सरकारने आतापर्यंत काय केले? राज्यातील गोर-गरिबांच्या मुलांचे वाटोळे करायचे आहे का? असा प्रश्न …

Read More »

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे समोर सरकार हतबल भीमा कोरेगांवप्रकरणी विधान परिषदेत चर्चेची मागणीने गोंधळ : परिषद दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडे, मिलींद एकबोटे या दोन व्यक्तींपुढे भारतीय जनता पार्टीचे सरकार हतबल झाल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत भीमा कोरेगांव येथील दंगल ही सरकार पुरस्कृत दंगल असल्याचा  आरोप करत या दिवसभराचे कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली. विधान परिषदेचे सकाळी …

Read More »

लसीकरण निविदेत चालढकल करणाऱ्या मंत्र्याची चौकशी कोण करणार? विरोधक आक्रमक तर पदुम राज्यमंत्री खोतकर यांची त्रेधातिरपीट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांची जनावरे असलेल्या बैल, गाय, म्हशींना लाळ-खुरकत रोगाची लागण होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील वर्षभरापासून जनावरांना लस देण्यासाठी निविदेचा सातवेळा घोळ घालण्यात येत असल्याने घोळ घालणाऱ्या संबधित पदुम आयुक्त आणि मंत्र्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »